कोडोली हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के.
कोडोली हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के.
कार्वे प्रतिनिधी :-
कोडोली ता.कराड येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशालेतील इयत्ता दहावीचा निकाल सलग पाच वर्ष शंभर टक्के लागला आहे. गौरी विकास जगताप हिला 90% टक्के गुण मिळाले ती विद्यालयात पहिली आली. प्रज्ञा भरत माने हिला 84.80% गुण मिळवून द्वितीय तर आदित्य रमेश जगताप 84.40% गुण मिळवून तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक श्री तरवारे के.पी. व शिक्षक श्री. मोरे आय.जे. श्री.आंबी एस.ए.सौ. जाधव व्ही.ए.सौ.संदे एस. ए.
शिक्षक इतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक कोडोली गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment