राज्यात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून लागू होणार.

 राज्यात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून लागू होणार.

गोंडवाना न्यूज नेटवर्क -

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर्षी फक्त विद्यापीठ संकुलात आणि स्वायत्त महाविद्यालयातच राबवले जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पुढील वर्षीपासून ते टप्प्याटप्याने राबविण्याचा निर्णय काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या कुलगुरू यांच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात सुकाणू समिती आणि सर्व कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार केली आहे.

या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये “एनईपी’ अंमलबजावणीसाठी अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. या धोरणाची अंमलबजावणी करत असताना विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणी यावर सकारात्मक दृष्टिकोनातून सर्व विषयांवर सकारात्मक धोरण ठरविले जाणार असल्याचे ते म्हणाले.


केंद्र सरकारकडून देशातील सर्व उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठाची क्रमवारी जाहीर  केली जाते. आता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रॅंकिंग जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .