मनसेच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे कालवडेकराना मिळाला रस्ता.
मनसेच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे कालवडेकराना मिळाला रस्ता.
कराड तालुक्यातील वाठार येथे कालवडे गावांत जाण्या करिता मांड नदी वर पूल होता.कराड-कोल्हापूर महामार्गाच्या कामांकरिता तो पूल पाडण्यात आला.त्यामुळे कालवडे गावात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने कालवडे ग्रामस्थांसह इतर वाहनधारकांना महामार्ग वरून विरुद्ध दिशेने (wrong side)ने जीव धोक्यात घालून उलटा प्रवास करावा लागत होता.त्यामध्ये कोणाचा तरी जीव जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याला पर्यायी रस्ता द्यावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अँड विकास पवार,मनसे वहातुक सेलचे उपजिल्हा संघटक सतीश यादव यांचे वतीने दि 6 जून रोजी निवेदन देण्यात आले होते. व जर का 6 जून पर्यंत पर्यायी रस्ता न झाल्यास महामार्ग वर रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मनसेच्या निवेदनाची मा.तहसीलदार साहेब व तालुका पोलीस स्टेशन चे अधिक्षक मा आनंदराव खोबरे साहेब यांनी दखल घेऊन महामार्ग अधिकारी अदानी चे जनरल मनेजर देवेंद्र शर्मा यांना बोलावून घेऊन पर्यायी रस्ता बाबत खोबरे साहेब,देवेंद्र शर्मा साहेब, रस्ते अतिक्रमण अधिकारी विकास पाटील साहेब व मनसे जिल्हाध्यक्ष अँड विकास पवार,सतीश यादव,व इतर पदाधिकारी यांची बैठक झाली.त्यामध्ये मनसेच्या वतीने पर्यायी रस्ता सुचवण्यात आला.तो खर्चीक असतांना ही महामार्ग अधिकारी यांनी तो मान्य केला. व लगेच कामास सुरुवात केली. व काम दि 6जून 2023 अखेर भला मोठा खर्च करून पर्यायी रस्ता करून दिला. त्यामुळे मनसेचे दि 6जुनचे रस्ता रोको आंदोलन रद्द झाले.मात्र सर्व अधिकारी व पोलीस प्रमुख यांनी चांगल्या कामात मदत केली म्हणून मा.आनंदराव खोबरे साहेब व अदानी ग्रुपचे मॅनेजर देवेंद्र शर्मा व रस्ते अतिक्रमण अधिकारी विकास पाटील यांचा मा अँड विकास पवार, व सतिश यादव यांचे वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार रस्त्याचे कामाचे ठिकाणी करण्यात आला. यावेळी मनसे रोजगार विभागाचे नितीन महाडिक ,उपतालुका अध्यक्ष राजेंद्र कांबळे इत्यादी उपस्थित होते.


Comments
Post a Comment