दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य योजना.
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य योजना.
सातारा, दि. 15 – बेरोजगार 18 ते 50 वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्यात येते.
या योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज प्रकल्पास मंजुरीसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडे शिफारस करण्यात येते. बँकेने मंजूर केलेल्या कर्ज प्रकल्पाच्या 20 टक्के सबसिडी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांच्यामार्फत मंजूर करून एकत्रित रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध करून दिली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्वाचा दाखला (युडीआयडी), उत्पन्नाचा दाखला, बेरोजगार दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, जागेचे संमतीपत्र, व्यवसाय कोटेशन, रहिवासी दाखला, जागेचा उतारा, प्रकल्प अहवाल, शॉप ॲक्ट लायसन्स व शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रांसह दोन प्रतीत प्रस्ताव सादर करावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सपना घोळवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

Comments
Post a Comment