भरत कदम यांचे निधन.
भरत कदम यांचे निधन.
कराड, दि. 6 ः येथील टिळक हायस्कूलचे क्रीडाशिक्षक व उत्कृष्ठ सुत्रसंचालक, पत्रकार भरत रघुनाथ कदम (वय 45) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे मुळ गाव येणके (ता. कराड) असून येथील ग्रामविकास प्रतिष्ठानचे ते सचिव म्हणून काम पहात होते. याचबरोबर गावच्या विकासासाठी ते नेहमी कार्यरत असायचे. मनमिळाऊ स्वभावामुळे ते कराड शहरासह तालुक्यात ते लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे येणके गावावर शोककळा पसरली असून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी गुरुवार दि. 8 रोजी येणके ता. कराड येथे सकाळी 9 वाजता होणार आहे.

Comments
Post a Comment