Posts

Showing posts from September, 2023

कराड नगरपरिषद कराड इंडियन स्वच्छता लीग, 2.0,मेगा वॉकेथॉन.

Image
  कराड नगरपरिषद कराड इंडियन स्वच्छता लीग, 2.0,मेगा वॉकेथॉन.  कराड - प्रतिनिधी.  "स्वच्छता पंधरवडा" व "स्वच्छता ही सेवा" या अभियान अंतर्गत कराड नगरपरिषद व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिन आज निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले .सकाळी 6.30 वाजता रॅलीची सुरवात सह्याद्री हॉस्पिटल- जुना कोयना पूल - शाहू चौक- दत्त चौक - चावडी चौक मार्गे कृष्णाघाट या ठिकाणी संपन्न झाली. सह्याद्री हॉस्पिटलच्या स्टाफ ने प्रीतिसंगम बागे समोर पथनाट्य सादर केले त्या मध्ये आजच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. हल्ली प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागते.हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना हृदयविकारांबाबत जागरूक करणे आहे. हृदय रोग टाळण्यासाठी गरजेपेक्षा फास्ट फूड जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे बंद करायला हवे.भरपूर व्यायाम करावा.भरभर चालणे,धावणे, पोहणे, सायकल चालवने यासारखा व्यायाम करावा. ज्य...

पालकर शाळेमध्ये पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न .

Image
  पालकर  शाळेमध्ये  पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न . कराड  - प्रतिनिधी. कराड येथील  शिशु शिक्षण संस्थेच्या पालकर शाळेमध्ये  अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांतील   सर्व महिला पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन आज बुधवार दिनांक 27/9/2023 रोजी करण्यात आले होते.  या स्पर्धेमध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून उकडीच्या तांदळाचे किंवा गव्हाचे मोदक अतिशय सुंदर रित्या तयार करून एकूण 80 स्त्री स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम समाजाच्या महिला देखील या स्पर्धेमध्ये सुंदर अशा मोदकांच्या पाककृती घेऊन उपस्थित होत्या .स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून शिशु शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.सुरेखाताई पालकर, संचालिका सौ.वैशाली पालकर तसेच परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या सौ. अर्चना इनामदार व सौ.तृप्ती पालकर यांच्या उपस्थितीत एकूण 80 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामधून पाच स्पर्धक विजयी घोषित करण्यात आले .सर्व शाखेतील मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, यांनी या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा अतिशय उत...

हौसाबाई विठ्ठल कांबळे यांचे निधन.

Image
हौसाबाई विठ्ठल कांबळे यांचे निधन. शिराळा -प्रतिनिधी.  कालकथीत हौसाबाई विठ्ठल कांबळे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 90व्या वर्षी मंगळवार  दि.26/9/2023रोजी  निधन झाले. त्या वसंत विठ्ठल कांबळे आणि शंकर विठ्ठल कांबळे याच्या आई होत.रक्षाविसरजन व पुण्यानुमोदन रविवार दि. 1/10/2023 सकाळी ठीक 10 वाजता त्यांच्या राहत्या घरी मु. पाचगणी ता. शिराळा जि. सांगली येथे होणार आहे.

चिंचोली ता.शिराळा येथे श्रमदानातून वनराई बंधार्यांच निर्माण.

Image
  चिंचोली ता.शिराळा येथे श्रमदानातून  वनराई बंधार्यांच निर्माण. शिराळा - प्रतिनिधी. चिंचोली ता. शिराळा येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे बांधण्यात आले.मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने या वनराई बंधारे यांचे निर्माण करण्यात आलं.सरपंच सौ. कविता पाटील,उपसरपंच सौ. रूपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानाचे काम पार पडले.यावेळी तलाठी मा.उमेश यादव ग्रामविकास अधिकारी ‌मा.योगेश नाईक,मा. भुजंग जंगम, यांच्या सहकार्याने व मा.भरत चव्हाण पोलिस पाटील,मा. सुरेश जाधव, मा.नथुराम जाधव,मा.सुनिल घोलप,मा.महेश घोडे यांनी श्रमदानातून बंधारे बांधण्यास सहकार्य लाभले .

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयात औषध निर्माता दिन उत्साहात साजरा.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयात औषध निर्माता दिन उत्साहात साजरा. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक औषध निर्माता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस औषध निर्माणशास्त्र व औषधनिर्माता यांचे महत्त्व तसेच त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच यावेळी ही यावर्षीच्या थीम, फार्मसी  स्ट्रेन्ग्थइनिंग हेअल्थ सिस्टिम्स,  अंगदान महादान ला अनुसरून रांगोळी स्पर्धा, चित्र व घोषवाक्य रेखाटन स्पर्धा  आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रथम व द्वितीय वर्षातील मुलांनी उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता. त्यातून त्यांनी अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य का महत्त्वाचे आहे,  फार्मासिस्टच्या काय जबाबदाऱ्या आहेत, अवयव द...

स्वा.दादासाहेब उंडाळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत उज्वल यश.

Image
स्वा.दादासाहेब उंडाळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत उज्वल यश.  उंडाळे - प्रतिनिधी. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोनवडे ता.भुदरगड येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येथील स्वा दादासाहेब उंडाळकर कनिष्ठ महाविद्यालयाची  विद्यार्थीनीं  अमृता  चौगुले, व आर्या पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांची  राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  अमृता चौगुले हिने 17 वर्षे वयोगटातील 57 किलो  वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला  तिची कुरुंदवाड येथे होणार्‍या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर आर्या पवार हिने 19 वर्षाखालील वयोगटातील 62 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला तिचे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तर महाविद्यालयातील  प्रांजल चव्हाण 17 वर्षाखालील 46 किलो  वजनी गटात द्वितीय क्रमांक , रेश्मा जांभळे 17 वर्षाखालील 53 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक ओमकार भोसले 17 वर्षाखालील 71 किलो वजनी गटात तृतीय क्रमाक श्रेयश यादव 17 वर्षाखाली 111 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक...

एस. आर. दळवी (I) फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाला नुकतीच भेट.

Image
  एस. आर. दळवी (I) फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाला नुकतीच भेट. उंडाळे :-  रामचंद्र दळवी यांचा सत्कार करताना विद्यालयाचे पर्यवेक्षक जे. एस माळी, धनंजय पवार, शंकर आंबवडे, भीमराव जाधव आदी. उंडाळे - प्रतिनिधी. उंडाळे ता.. एस. आर. दळवी (I) फाऊंडेशनचे संस्थापक  .श्री. रामचंद्र दळवी व सौ.सीता दळवी यांनी येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यालयांमध्ये राबवलेले विविध उपक्रमांची माहिती घेतली. एस आर दळवी फाउंडेशनच्या सहकार्याने राबविलेल्या पर्यावरण विषयक  उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही असेच पर्यावरण पूरक उपक्रम आयोजित करण्यासाठी फाउंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. निसर्ग प्रेमातून असे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात राबविले जात आहेत. आज उभयतांनी स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळे ता. कराड  येथे सदिच्छा भेट देऊन विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती घेतली. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक व एस. आर. ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) करणार रास्ता रोको.

Image
  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) करणार रास्ता रोको. सातारा जिल्हाधिकारी यांना दिलं निवेदन. सातारा - प्रतिनिधी. बेडग ता- मिरज जि- सांगली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान तेथील गावगुंडांनी पाडली ती स्वागत कमान पुन्हा बांधून मिळणेबाबत,बेडग येथील बौद्ध बांधवांनी बेडग ते मुंबई मंत्रालय असा पायी लॉग मार्च सुरू केला सदर ज्वलंत प्रश्नाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सातारा जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दिनांक 22 /9 /2023 रोजी सकाळी ११ वाजता वाडे फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या आशयाचे निवेदन मा.अशोक बापू गायकवाड सातारा जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, प्रतीक गायकवाड उपाध्यक्ष सातारा जिल्हा युवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, निलेश गाडे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष, आनंद वायदंडे, अण्णा वायदंडे प्रदेश उपाध्यक्ष मातंग आघाडी महाराष्ट्र राज्य, स्वप्निल गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष युवक आघाडी, आप्पासाहेब गायकवाड जिल्हा सरचिटणीस, या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.             ...

येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात उत्साहात संपन्न .

Image
  येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास  मंडळाचा  आगमन सोहळा मोठ्या दिमाखात  उत्साहात संपन्न .                                     उंडाळे - प्रतिनिधी  येवती  ता.कराड येथील  जय महाराष्ट्र गणेश विकास  मंडळाचा एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्शवत आहे,त्याचप्रमाणे  जय महाराष्ट्र गणेश विकास  मंडळाचा आगमन सोहळा देखील मोठ्या उत्साहात दिमाखात  संपन्न झाला .पाचवड फाटा  ते येवती मोठ्या थाटामाटात रॅली काढून गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले, येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केलेल्या अतिशय सुंदर नियोजनामुळेच   पाचवड ते येवती रॅली उत्साहात संपन्न झाली ही  रॅली  उंडाळे मार्गे   येवती मध्ये  पोहोचली .येवती येथे आल्यानंतर  बौद्धजन हितवर्धक संघाच्या वतीने येवती चा राजा गणपती माझा या गणेशा वरती पुष्पवृष्टी करण्यात आली .त्यानंतर सर्व येवती गावातील  महिला मंडळ यांनी गणेशाची ...

स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे ता.कराड येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची जनजागृती करण्यासाठी परिपत्रक वाटप.

Image
 स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालय  उंडाळे ता.कराड  येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची जनजागृती करण्यासाठी परिपत्रक वाटप. उंडाळे :- पत्रकांचे प्रकाशन करताना प्राचार्य बी. आर. पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी, गुंड एन एम, पाटील एस आर, बाबर पी एम, प्रदीप ओंबासे आदी . उंडाळे - प्रतिनिधी. पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या एस आर दळवी(I) फाउंडेशन व स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून याबाबत जनजागृती करण्यासाठी 1500 पत्रक छापून त्याचे विद्यार्थ्यांच्या मार्फत वितरण केले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.  वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यामध्ये जल, ध्वनी, वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे त्याचाच एक भाग म्हणून, स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालय व एस आर दळवी फाउंडेशन यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे गणेशोत्सव दरम्यान डेक...

विश्वकर्मा योजनेतून कोणत्याही हमीशिवाय मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज.

Image
  विश्वकर्मा योजनेतून  कोणत्याही हमीशिवाय मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्या ना कोणत्या योजना राबवत आहे, त्याचा फायदा देशातील करोडो लोक घेत आहेत. अशीच सरकारने आता एक  योजना आणली आहे, ज्याच्या अंतर्गत   कर्ज मिळणार आहे , कोणत्याही हमीशिवाय. तुम्हाला आता विश्वकर्मा योजनेअंतर्गत एकूण 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे, तुम्हीदेखील सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "विश्वकर्मा योजना देशातील ही स्थानिक उत्पादने जागतिक बनवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पाठीचा कणा असतो, त्याप्रमाणे समाजजीवनात विश्वकर्मा सोबती खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. दैनंदिन जीवनात त्याशिवाय कल्पना करणे खूप अवघड आहे. आजही फ्रिजच्या जमान्यात अनेकांना लोकांना मडक्यातील पाणी प्यायला खूप आवडते, तसेच या मित्रांना ओळखून त्यांना आधार देणे ही काळाची गरज बनली आहे. तसेच विश्व...

येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाने साकारले भव्य गणेश मंदिर .

Image
  येवती येथील  जय महाराष्ट्र गणेश मंडळाने साकारले भव्य  गणेश मंदिर . गणेशोत्सव काळात होणार मूर्तीची  प्राणप्रतिष्ठापना,  विविध सामाजिक , धार्मिक सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन.   उंडाळे - प्रतिनिधी. 31  वर्षापासून  एक गाव एक गणपतीची परंपरा जपलेले येवती  गाव ता.कराड आणि याच गावातील   जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाने यावर्षी गणेशाचे  कायमस्वरूपी मंदिर उभारण्याचे ठरवले , आणि ते पूर्ण देखील झाले  याच मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना  सोहळा मंगळवार  दिनांक 19 रोजी होत असून पुढील दहा दिवस विविध प्रकारच्या सामाजिक , धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .यामध्ये सोमवार दिनांक 18  रोजी होमवहन ,वास्तुशांती ,श्रींचे आगमन , मिरवणूक तर दिनांक 19  रोजी कलशारोहण समारंभ, गणेश मूर्तीची स्थापना, महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी भारुडाचा कार्यक्रम तर दिनांक 20 रोजी सायंकाळी संगीत खुर्ची व गोंधळ व  जागरण कार्यक्रम  21 रोजी  महिलांसाठी  हळदीकुंकू कार्यक्रम, दिनांक 22 ...

राष्ट्रीय कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघाच्या धरणे आंदोलनला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा.

Image
राष्ट्रीय कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघाच्या धरणे आंदोलनला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा. शिराळा - प्रतिनिधी. शिराळा या ठिकाणी तहसील कार्यालय समोर राष्ट्रीय कामगार महासंघाच्या व बहुजन क्रांती महासंघाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय धरणे आंदोलनाला राष्ट्रीय कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश दाभाडे व N.D गुरुजी पाटील यांचे तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेल्या बांधकाम कामगार, रेशन धान्यापासुन वंचित असणारे नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी एक दिवशीय धरणे आंदोलनच्या मागण्यासाठी याप्रसंगी समता पक्षाचे नेते व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव काळे, शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे, सुर्यकांत कांबळे, संजय कांबळे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी व सदस्य व महिला आघाडी उपस्थितीत होते.

कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी.

Image
  कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :- को कणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी  मोठी बातमी . कोकणात गणपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने याबाबत एक परिपत्रक ही प्रसिद्ध केलं आहे. या परिपत्रकात , आगामी सन २०२३ च्या आगामी गणेशोस्तव कालावधीत "कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोस्तवानिमित्त पथकर माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचना व निर्देश दिलेत. ,''२०२३ च्या गणेशोस्तवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने १६.०९.२०२३ ते १.१०.२०२३ या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (रा.म-४८),  मुंबई  गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा.म -६६) वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोस्तव भाविकांना / वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे.  गणेशभक्तांना गाडीवर लावावं लागेल 'गणेशोस्तव २०२३, कोकण दर्श...

G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण.

Image
  G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची (जीबीए) (Global Biofuel Alliance) घोषणा केली आहे. हा जागतिक ऊर्जा क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. जैवइंधनाचा वापर सुलभ करण्यासाठी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योग यांची आघाडी विकसित करण्यासाठी जीबीए हा भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे. हा उपक्रम भारतासाठी अनेक आघाड्यांवर फायदेशीर ठरणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जैवइंधन विकासाला चालना देण्यासाठी जैवइंधनाचे सर्वात मोठे ग्राहक आणि उत्पादकांना एकत्र आणने हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. जैवइंधनांना ऊर्जा संक्रमणाची गुरुकिल्ली म्हणून स्थान देणं तसेच रोजगार आणि आर्थिक वाढीस हातभार लावणं हा देखील उद्देश आहे. जीबीएच्या घोषणेमुळं जी-20 अध्यक्ष म्हणून आणि "व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ'चे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताचा सकारात्मक अजेंडा दिसून येत आहे. जागतिक विकास आणि रोजगारावाढीस चालना जीबीए मूल्य साख...

वडगाव हवेली येथे बालचमुच्या दहीहंडीने साजरी केली जन्माष्टमी.

Image
  वडगाव हवेली येथे बालचमुच्या  दहीहंडीने साजरी केली जन्माष्टमी. कार्वे प्रतिनिधी :-  श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे वडगाव हवेली ता. कराड येथील सर्व अंगणवाडी केंद्र व सर्व प्राथमिक शाळा एकत्र येत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बालचमुनी श्रीकृष्ण, राधा, सुदामा व सवंगडी यांची वेशभूषा करून गावामधून दिंडी काडून एकत्र येत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी दिंडीमध्ये  सर्व अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' साजरा.

Image
  शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' साजरा. "अक्षर ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक"____प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड. कराड -प्रतिनिधी. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे होय पण आधुनिक दृष्टिकोनानुसार साक्षरतेचा अर्थ व्यापक स्वरूपाचा आहे. साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ज्ञान नव्हे तर शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास होणे हीच खरी साक्षरता असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी कार्यक्रम प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. एम.एस. सूर्यवंशी यांनी केलं. अक्षर ज्ञान म्हणजे साक्षरता नसून आधुनिक काळाप्रमाणे बँक व्यवहार संगणक ज्ञान तसेच आपल्या ज्ञानाचा प्रत्येक ठिकाणी व्यवहारात वापर करता येणे म्हणजे साक्षरता होय असे मत प्रास्ताविक करताना डॉ. एम. एस. सूर्यवंशी यांनी मांडले. कराड:- उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. एस.डी. कांबळे. या का...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात डेंग्यू जनजागृती अभियान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात डेंग्यू जनजागृती अभियान संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयाच्यावतीने बाळसिद्ध विद्यालय घोगाव या ठिकाणी डेंग्यू विषयी पथनाट्य सादरीकरण केले. डेंग्यू कसा होतो त्याची लक्षणे कशी ओळखायची डेंग्यू होण्याची कारणे व त्यावरील उपाय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घोगाव गावामध्ये प्रभात फेरी काढून डेंग्यू विषयी जनजागृती केली.या कार्यक्रमासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रस्थापित राजकीय पक्ष-नेत्यांनी मराठा समाजाचे भावनिक शोषण करून महाराष्ट्र पेटवण्याचे धंदे ताबडतोब थांबवावेत .

Image
  प्रस्थापित राजकीय पक्ष-नेत्यांनी  मराठा समाजाचे भावनिक शोषण करून महाराष्ट्र पेटवण्याचे धंदे ताबडतोब थांबवावेत . ____ॲड.डॉ.सुरेश माने. मुंबई - प्रतिनिधी. महाराष्ट्रात मराठवाड्यातील जालना येथे मराठा आंदोलकांचा मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चावर पोलिसांचा  अमानुष लाठीमार  त्यामुळे नंतरच्या, दगडफेक, जाळपोळ, शासकीय पुलिस व इतर वाहनांची तोडफोड,  त्यामुळे अनेक आंदोलकावर गुन्हे दाखल,  अटक यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण प्रश्न हा कळीचा मुद्दा बनलेला असून शिंदे- फडणवीस- पवार सरकार समोर एक राजकीय आव्हान म्हणून देखील उभा ठाकलेला आहे.   जालन्यातील मराठा आंदोलकावर झालेला दुर्दैवी लाठीमार आणि त्यानंतर  आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे, अटक याचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तीव्र निषेध करते आणि त्याबद्दल महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे,  देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार या तीन पक्षांच्या हिंदुत्ववादी सरकारने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे हीच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची भूमिका आहे. खरे तर इतके दिवस अत्यंत शांत व संयमीपणाचे दर्शन घडवीत मर...

देशसेवेतून वनगळ गावचे अतुल नवले सेवानिवृत्त.

Image
  देशसेवेतून वनगळ गावचे अतुल नवले सेवानिवृत्त. कराड - प्रतिनिधी. वनगळ ता. सातारा जि.सातारा गावचे सुपूत्र श्री अतुल नवले हे २२ वर्ष देश रक्षण करून सेवानिवृत्त झाले . त्यांनी जम्मू काश्मिर येथे आपली देशसेवा केली ते आपल्या माय भूमित परतले आसता कृष्ण धाम सोसायटी खेड येथे त्यांचे मोठ्या जल्लोषात वाजत गाजत स्वागत करण्यात आले . सोसायटी मध्ये त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त पूर्ण रांगोळी सजावट करण्यात आली होती . सोसायटी मधील सर्व स्त्रियांनी त्यांचे औक्षण केले . सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी सौ स्वाती नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सोसायटी मधील प्रा. श्री लक्ष्मण उबाळे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा सांगून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमा साठी वनगळ गावचे ग्रामस्थ, नातेवाईक ,मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते . हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सोसायटीतील सदस्य घाडगे साहेब, जाधव साहेब , पवार साहेब तसेच प्रविण शिंदे , अमोल शिदे, सुशिल घाडगे , श्रेयश नवले , पारस उबाळे, अमोल पवार, प्रविण पवार, सुभाष घाटगे, संजय पवार, अरुण जाधव,  यांनी परिश्रम घ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वेबिनार संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये बेसिकगुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस व करिअर अपॉर्च्युनिटी यावरती वेबिनार संपन्न झाले. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून विविध गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच फार्मास्यूटिकल कंपनीमध्ये  नियमित दिनचर्या तसेच उत्पादन कसे असते त्याचे नियम काय असतात हे माहीत असणे गरजेचे आहे यासाठी महाविद्यालयामध्ये भरत पवार यांचे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. पवार सर हे फ्लेमिंगो फार्मासिटिकल, नांदेड येथे सिनिअर मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत त्यांनी फार्मासिटिकल कंपनीमध्ये होणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी जसे की रेकॉर्ड डॉक्युमेंटेशन, रॉ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस प्रोसेसेस, प्रोडक्शन पॅकेजिंग क्वालिटी अनालिसिस अशा विविध गोष्टी समजावून सांगितल्या. तसेच फार्मसी क्षेत्रातील विविध करिअर संधी व उच्च शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी प्...

आई-वडिलांना जी मुलं सांभाळणार नाहित त्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले मिळणार नाहीत.

Image
  आई-वडिलांना जी मुलं सांभाळणार नाहित त्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले मिळणार नाहीत.   कराड तालुक्यातील मसूर गावच्या ग्रामपंचायतीचा ठराव.  कराड -प्रतिनिधी. आई-वडिलांना जी मुलं सांभाळणार नाहित त्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले न देण्याबाबतचा ठराव कराड तालुक्यातील मसूर ग्रामपंचायतीने नुकताच घेतला आहे. तसेच प्रत्येकाने नावामध्ये स्वतःचे नाव त्यानंतर आईचे, वडिलांचे व आडनाव असे क्रमशः लावायचे आहे अशा धोरणात्मक निर्णयाचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंकज दीक्षित होते. दरम्यान असा ठराव घेणारी ही राज्यातील कदाचित पहिलीच ग्रामपंचायत असावी त्यामुळे या ठरावाचे राज्यभरातून विशेष कौतुक होताना दिसतंय दरम्यान राज्यभरातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी हा ठराव करण्याची गरज असून भविष्यात याबाबतीत कायदा होण्याची देखील गरज असल्याचे सरपंच पंकज दीक्षित यांनी  सांगितले. यावेळी  माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, माजी उपसरपंच संजय शिरतोडे, सदस्य रमेश जाधव, सुनील जगदाळे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस न...

आयडीबीआय ग्रामीण प्रशिक्षण संस्थेत माजी प्रशिक्षणार्थींचा संवाद मेळावा संपन्न.

Image
  आयडीबीआय ग्रामीण प्रशिक्षण संस्थेत माजी प्रशिक्षणार्थींचा संवाद मेळावा संपन्न. सातारा, दि.31 (जिमाका):   आयडीबीआय ग्रामीण प्रशिक्षण संस्था  (आरसेटी ) सातारा यांच्या वतीने संस्थेत प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय यशस्वीपणे सुरु करणाऱ्या माजी प्रशिक्षणार्थींचा संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक शमाकांत शेडगे, काटदरे उद्योग समूहाचे व्यवस्थापक पराग काटदरे, आयडीबीआय आरसेटीचे संचालक श्री प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.   आरसेटीच्या उपक्रमाचे कौतुक करुन नव उद्योजकांनी  नवनव्या संधी शोधून आपल्या समस्यांतून मार्ग काढावा व यशस्वी उद्योजक व्हावे, असे जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. शेडगे यांनी यावेळी सांगितले.   आपल्या मनोगतात काटदरे उद्योग समूहाचे श्री. काटदरे यांनी आपले उद्योजकीय अनुभव सांगताना सुरुवातीस छोट्या प्रमाणात उद्योगाची सुरुवात करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सतत आपल्या उद्योगाची वाढ करावी असे  सांगितले.   आयडीबीआय आरसेटीचे संचालक श्री   पाटील यांनी या संवाद मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विशद करताना संस्...