कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वेबिनार संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वेबिनार संपन्न.


उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये बेसिकगुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस व करिअर अपॉर्च्युनिटी यावरती वेबिनार संपन्न झाले.

फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून विविध गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच फार्मास्यूटिकल कंपनीमध्ये  नियमित दिनचर्या तसेच उत्पादन कसे असते त्याचे नियम काय असतात हे माहीत असणे गरजेचे आहे यासाठी महाविद्यालयामध्ये भरत पवार यांचे वेबिनार आयोजित करण्यात आले होते. पवार सर हे फ्लेमिंगो फार्मासिटिकल, नांदेड येथे सिनिअर मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत त्यांनी फार्मासिटिकल कंपनीमध्ये होणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी जसे की रेकॉर्ड डॉक्युमेंटेशन, रॉ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस प्रोसेसेस, प्रोडक्शन पॅकेजिंग क्वालिटी अनालिसिस अशा विविध गोष्टी समजावून सांगितल्या. तसेच फार्मसी क्षेत्रातील विविध करिअर संधी व उच्च शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन सोनल सातपुते यांनी केले व आभार मोनिका चवरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .