पालकर शाळेमध्ये पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न .

 पालकर  शाळेमध्ये  पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न .

कराड  - प्रतिनिधी.

कराड येथील  शिशु शिक्षण संस्थेच्या पालकर शाळेमध्ये  अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या सर्व शाखांतील   सर्व महिला पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन आज बुधवार दिनांक 27/9/2023 रोजी करण्यात आले होते. 

या स्पर्धेमध्ये गणेशोत्सवाचे औचित्य साधून उकडीच्या तांदळाचे किंवा गव्हाचे मोदक अतिशय सुंदर रित्या तयार करून एकूण 80 स्त्री स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम समाजाच्या महिला देखील या स्पर्धेमध्ये सुंदर अशा मोदकांच्या पाककृती घेऊन उपस्थित होत्या .स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून शिशु शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.सुरेखाताई पालकर, संचालिका सौ.वैशाली पालकर तसेच परीक्षक म्हणून काम पाहिलेल्या सौ. अर्चना इनामदार व सौ.तृप्ती पालकर यांच्या उपस्थितीत एकूण 80 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामधून पाच स्पर्धक विजयी घोषित करण्यात आले .सर्व शाखेतील मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, यांनी या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा अतिशय उत्साही वातावरणात पार पडल्या .

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुषमा पाटील यांनी मिळवला तर दुसरा क्रमांक धनश्री खोचरे तर तिसरा क्रमांक प्रियांका कांबळे,चौथा क्रमांक मनीषा बल्लाळ तर पाचवा क्रमांक  सारिका मंडले यांना मिळाला . उत्तेजनार्थ क्रमांक अनुक्रमे कल्याणी सूर्यवंशी अस्मिता सूर्यवंशी प्रियांका पाटील  विजेत्या स्पर्धकांना शाळेच्या वतीने बक्षीसे रक्कम स्वरूपात देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .