शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' साजरा.
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' साजरा.
"अक्षर ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक"____प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड.
कराड -प्रतिनिधी.
शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला.
साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे होय पण आधुनिक दृष्टिकोनानुसार साक्षरतेचा अर्थ व्यापक स्वरूपाचा आहे. साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ज्ञान नव्हे तर शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास होणे हीच खरी साक्षरता असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी कार्यक्रम प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. एम.एस. सूर्यवंशी यांनी केलं. अक्षर ज्ञान म्हणजे साक्षरता नसून आधुनिक काळाप्रमाणे बँक व्यवहार संगणक ज्ञान तसेच आपल्या ज्ञानाचा प्रत्येक ठिकाणी व्यवहारात वापर करता येणे म्हणजे साक्षरता होय असे मत प्रास्ताविक करताना डॉ. एम. एस. सूर्यवंशी यांनी मांडले.
कराड:- उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. एस.डी. कांबळे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.एस.डी.कांबळे यांनी उपस्थितांना साक्षरता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिक्षणाचा आधार घेऊन व्यक्तिमत्व विकास करता येणे म्हणजेच साक्षरता होय, अंधश्रद्धा दूर करून ज्ञान आणि विज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे असे केले तर माणूस सर्वांगीण दृष्ट्या साक्षर झाला असे म्हणता येईल असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. एस.डी.कांबळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयदीप चव्हाण यांनी केलं. कार्यक्रमाचे स्वागत व पाहुण्याचा परिचय प्रा. लाटवडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्रा. अर्जुन जगताप यांनी केलं.



Comments
Post a Comment