देशसेवेतून वनगळ गावचे अतुल नवले सेवानिवृत्त.

 देशसेवेतून वनगळ गावचे अतुल नवले सेवानिवृत्त.


कराड - प्रतिनिधी.

वनगळ ता. सातारा जि.सातारा गावचे सुपूत्र श्री अतुल नवले हे २२ वर्ष देश रक्षण करून सेवानिवृत्त झाले . त्यांनी जम्मू काश्मिर येथे आपली देशसेवा केली ते आपल्या माय भूमित परतले आसता कृष्ण धाम सोसायटी खेड येथे त्यांचे मोठ्या जल्लोषात वाजत गाजत स्वागत करण्यात आले . सोसायटी मध्ये त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त पूर्ण रांगोळी सजावट करण्यात आली होती . सोसायटी मधील सर्व स्त्रियांनी त्यांचे औक्षण केले . सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी सौ स्वाती नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सोसायटी मधील प्रा. श्री लक्ष्मण उबाळे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा सांगून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमा साठी वनगळ गावचे ग्रामस्थ, नातेवाईक ,मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते .हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सोसायटीतील सदस्य घाडगे साहेब, जाधव साहेब , पवार साहेब तसेच प्रविण शिंदे , अमोल शिदे, सुशिल घाडगे , श्रेयश नवले , पारस उबाळे,अमोल पवार, प्रविण पवार, सुभाष घाटगे, संजय पवार, अरुण जाधव, यांनी परिश्रम घेतले .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .