कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयात औषध निर्माता दिन उत्साहात साजरा.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयात औषध निर्माता दिन उत्साहात साजरा.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
25 सप्टेंबर हा दिवस जागतिक औषध निर्माता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस औषध निर्माणशास्त्र व औषधनिर्माता यांचे महत्त्व तसेच त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच यावेळी ही यावर्षीच्या थीम, फार्मसी स्ट्रेन्ग्थइनिंग हेअल्थ सिस्टिम्स, अंगदान महादान ला अनुसरून रांगोळी स्पर्धा, चित्र व घोषवाक्य रेखाटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रथम व द्वितीय वर्षातील मुलांनी उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता. त्यातून त्यांनी अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य का महत्त्वाचे आहे, फार्मासिस्टच्या काय जबाबदाऱ्या आहेत, अवयव दान तर केलेच पाहिजे व आपले जे अवयव आहेत त्यांची काळजी योग्य प्रकारे कशी घेतली पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन एन. एस. एस. इन्चार्ज प्रा. पूजा भोसले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी पूनम पाटील हिने केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
********

Comments
Post a Comment