एस. आर. दळवी (I) फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाला नुकतीच भेट.
एस. आर. दळवी (I) फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाला नुकतीच भेट.
उंडाळे ता.. एस. आर. दळवी (I) फाऊंडेशनचे संस्थापक .श्री. रामचंद्र दळवी व सौ.सीता दळवी यांनी येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यालयांमध्ये राबवलेले विविध उपक्रमांची माहिती घेतली. एस आर दळवी फाउंडेशनच्या सहकार्याने राबविलेल्या पर्यावरण विषयक उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही असेच पर्यावरण पूरक उपक्रम आयोजित करण्यासाठी फाउंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. निसर्ग प्रेमातून असे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात राबविले जात आहेत. आज उभयतांनी स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळे ता. कराड येथे सदिच्छा भेट देऊन विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती घेतली. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक व एस. आर. दळवी(I) फाउंडेशनचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. जे.एस. माळी ,श्री. शंकर आंबवडे , श्री. धनंजय पवार , श्री. भीमराव जाधव , श्री. रोहित गाडे, संजय साळुंखे, शिवाजी हावरे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment