स्वा.दादासाहेब उंडाळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत उज्वल यश.
स्वा.दादासाहेब उंडाळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत उज्वल यश.
उंडाळे - प्रतिनिधी.
राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोनवडे ता.भुदरगड येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येथील स्वा दादासाहेब उंडाळकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनीं अमृता चौगुले, व आर्या पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अमृता चौगुले हिने 17 वर्षे वयोगटातील 57 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला तिची कुरुंदवाड येथे होणार्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर आर्या पवार हिने 19 वर्षाखालील वयोगटातील 62 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला तिचे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तर महाविद्यालयातील प्रांजल चव्हाण 17 वर्षाखालील 46 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक , रेश्मा जांभळे 17 वर्षाखालील 53 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक ओमकार भोसले 17 वर्षाखालील 71 किलो वजनी गटात तृतीय क्रमाक श्रेयश यादव 17 वर्षाखाली 111 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकाविला.
यशस्वी विद्यार्थीना प्रा. अजीम इनामदार, प्रा. विवेक जाधव. यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा प्राचार्य बी आर पाटील, पर्यवेक्षक जे एस माळी, सुरेश वेदपाठक, प्रा. सतिश सावळकर, बादशाह शेख यांच्या हस्ते श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Comments
Post a Comment