येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाने साकारले भव्य गणेश मंदिर .
येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाने साकारले भव्य गणेश मंदिर .
गणेशोत्सव काळात होणार मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, विविध सामाजिक , धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
उंडाळे - प्रतिनिधी.
31 वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा जपलेले येवती गाव ता.कराड आणि याच गावातील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाने यावर्षी गणेशाचे कायमस्वरूपी मंदिर उभारण्याचे ठरवले , आणि ते पूर्ण देखील झाले याच मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगळवार दिनांक 19 रोजी होत असून पुढील दहा दिवस विविध प्रकारच्या सामाजिक , धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .यामध्ये सोमवार दिनांक 18 रोजी होमवहन ,वास्तुशांती ,श्रींचे आगमन , मिरवणूक तर दिनांक 19 रोजी कलशारोहण समारंभ, गणेश मूर्तीची स्थापना, महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी भारुडाचा कार्यक्रम तर दिनांक 20 रोजी सायंकाळी संगीत खुर्ची व गोंधळ व जागरण कार्यक्रम 21 रोजी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, दिनांक 22 रोजी सायंकाळी 6 ते 9 महिलांसाठी होम मिनिस्टर ,23 रोजी खास महिलांसाठी संगीत खुर्ची , 24 रोजी सायंकाळी 6 ते 9 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान , 25 रोजी सकाळी 11 नंतर शालेय स्पर्धा यामध्ये वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रात्री 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे . दिनांक 26 रोजी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिर व मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले आहे. दिनांक 27 रोजी लहान मुलांच्या डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, दिनांक 28 रोजी भव्य गणेश विसर्जन मिरवणूक सायंकाळी सहा ते अकरा या वेळेत होणार आहे, जय महाराष्ट्र मंडळाच्या मंडळाच्या वतीने दहा दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .सदर कार्यक्रमास ग्रामस्थांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

Comments
Post a Comment