कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी.
कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-
को कणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी. कोकणात गणपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारने टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने याबाबत एक परिपत्रक ही प्रसिद्ध केलं आहे. या परिपत्रकात , आगामी सन २०२३ च्या आगामी गणेशोस्तव कालावधीत "कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोस्तवानिमित्त पथकर माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुचना व निर्देश दिलेत.
,''२०२३ च्या गणेशोस्तवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने १६.०९.२०२३ ते १.१०.२०२३ या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (रा.म-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा.म -६६) वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोस्तव भाविकांना / वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे.
गणेशभक्तांना गाडीवर लावावं लागेल 'गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन' स्टीकर्स
टोलमाफी मिळवण्यासाठी गणेशभक्ताना आपल्या गाडीवर 'गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन' हे स्टिकर लावावं लागणार आहे.

Comments
Post a Comment