येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात उत्साहात संपन्न .

 येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास  मंडळाचा  आगमन सोहळा मोठ्या दिमाखात  उत्साहात संपन्न .     

                            

 उंडाळे - प्रतिनिधी

 येवती  ता.कराड येथील  जय महाराष्ट्र गणेश विकास  मंडळाचा एक गाव एक गणपती हा उपक्रम आदर्शवत आहे,त्याचप्रमाणे  जय महाराष्ट्र गणेश विकास  मंडळाचा आगमन सोहळा देखील मोठ्या उत्साहात दिमाखात  संपन्न झाला .पाचवड फाटा  ते येवती मोठ्या थाटामाटात रॅली काढून गणेशाचे आगमन मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले, येवती येथील जय महाराष्ट्र गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केलेल्या अतिशय सुंदर नियोजनामुळेच   पाचवड ते येवती रॅली उत्साहात संपन्न झाली ही  रॅली  उंडाळे मार्गे   येवती मध्ये  पोहोचली .येवती येथे आल्यानंतर  बौद्धजन हितवर्धक संघाच्या वतीने येवती चा राजा गणपती माझा या गणेशा वरती पुष्पवृष्टी करण्यात आली .त्यानंतर सर्व येवती गावातील  महिला मंडळ यांनी गणेशाची विधीवत ओवाळणी करून  रॅलीमध्ये सहभागी झाल्या .त्यानंतर गणेशाची मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मंडळाचे सर्व पदाधिकारी युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला, आबाल  वृद्ध ,सर्व धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .  त्यानंतर जिलेबी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. जय महाराष्ट्र गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी प्रथमच   ढोल पथकाचे आयोजन करण्यात आले होते. कराड तालुक्यामधील पहिलेच मंडळ असेल त्यांनी अशा प्रकारे रॅली काढून   अशा ढोल पथकाचे  आयोजन केले होते. येवती गावातील दोन्ही बँजो पथकाने देखील या मिरवणुकीमध्ये  आपला सहभाग देऊन गणेशाला मानवंदना दिली    .या यावेळी  गणेशाच्या दोन्ही मूर्ती ट्रॅक्टर मध्ये सजवून वाजत गाजत येवती गावापर्यंत आणण्यात आल्या .यामधील एक मूर्ती कायमस्वरूपी स्थापना करण्यासाठी तर दुसरी मूर्ती गणेशोत्सव संपल्यानंतर विसर्जन करण्यासाठी आणण्यात आल्या होत्या . खरोखरच अतिशय नयनरम्य असा हा सोहळा मोठा दिमाखात पार पडला .

                                      ******

      सांगली येथे मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांचा  भव्य मोर्चा संपन्न.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .