रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) करणार रास्ता रोको.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) करणार रास्ता रोको.
सातारा जिल्हाधिकारी यांना दिलं निवेदन.
सातारा - प्रतिनिधी.
बेडग ता- मिरज जि- सांगली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान तेथील गावगुंडांनी पाडली ती स्वागत कमान पुन्हा बांधून मिळणेबाबत,बेडग येथील बौद्ध बांधवांनी बेडग ते मुंबई मंत्रालय असा पायी लॉग मार्च सुरू केला सदर ज्वलंत प्रश्नाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सातारा जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दिनांक 22 /9 /2023 रोजी सकाळी ११ वाजता वाडे फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या आशयाचे निवेदन मा.अशोक बापू गायकवाड सातारा जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, प्रतीक गायकवाड उपाध्यक्ष सातारा जिल्हा युवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, निलेश गाडे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष, आनंद वायदंडे, अण्णा वायदंडे प्रदेश उपाध्यक्ष मातंग आघाडी महाराष्ट्र राज्य, स्वप्निल गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष युवक आघाडी, आप्पासाहेब गायकवाड जिल्हा सरचिटणीस, या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
******
बेडग ता- मिरज, जि- सांगली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाची स्वागत कमान पाडले प्रकरणी बेडग येथील बौद्ध बांधवांचा मंत्रालयावर लॉंग मार्च.
.jpeg)

Comments
Post a Comment