Posts

Showing posts from February, 2021

खोजेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अरुणा विजय जाधव या शेती संभाळून करत आहेत गावची सेवा.

Image
  खोजेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अरुणा विजय जाधव  या शेती संभाळून करत आहेत गावची सेवा. कराड - प्रतिनिधि ,(ज्ञानेश्वर शेवाळे ) सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी या छोट्याशा गावाने तब्बल नऊ पुरस्कार जिंकणारी ग्रामपंचायत म्हनुन नावलौकिक मिळविला आहे या गावच्या विद्यमान सरपंच सौ अरुणा जाधव यांनी आपल्या पती सोबत शेता मध्ये शेतीत सुद्धा मदत करत आहेत घर संसार आणि गावाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असलेल्या सरपंच सौ अरुणा जाधव यांचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

कोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ मीनाक्षी कैलास जगताप तर उपसरपंच पदी सचिन बाजीराव जगताप.

Image
      कोडोली  ग्रामपंचायतीच्या सरपंच  पदी सौ मीनाक्षी कैलास जगताप तर उपसरपंच पदी सचिन बाजीराव जगताप. कार्वे - प्रतिनिधि, कोडोली ता. कराड येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार जि. प. सदस्य उदयसिंह पाटील (उंडाळकर )यांचे हस्ते सत्कार करणेत आला.  कोडोली ता. कराड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. सरपंच पदी सौ मीनाक्षी कैलास जगताप तर उपसरपंच पदी सचिन बाजीराव जगताप यांची एकमताने निवड करणेत आली. त्या निमित्ताने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य  हनीफ शिकलगार, संदीप होनकळसे, विद्या शिंदे, विक्रम थोरात, विक्रम पाटील, अर्चना वाघमोडे, सुजाता लोकरे, वर्षा मदने, शिला जगताप यांचा उदयसिंह पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला.  या वेळी सुभाष जगताप, भरत जगताप, प्रतापसिंह जगताप, विक्रमसिंह जगताप, माजी उपसरपंच घनश्याम जगताप, संदीप मोरे, दत्तात्रय जगताप, पै. आबा जगताप, अभिजित जगताप इ ची उपस्थिती होती. यावेळी उदयसिंह पाटील यांची कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी   पदी निवड झालेबद्दल कोडोली गावाच्या वतीने सुभाष ...

119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु.

Image
  119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु.   सातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  *सातारा तालुक्यातील* सातारा  3, शहरातील  सिव्हील 2, राधिका रोड 1, सदरबझार 2, गोडोली 1, परतवडी 1, गोवे लिंब 1, खिंडवाडी 1, शाहूनगर 2, धसकॉलनी 5, देगाव 1, तासगाव 1,   *कराड तालुक्यातील* कराड शहरातील  शनिवार पेठ 1,  *फलटण तालुक्यातील*  पाडेगाव 1,  लक्ष्मीनगर 1, जाधववाडी 1, तरडगाव 2, खराडेवाडी 1, साखरवाडी 1, कापडगाव 1, भडकमकरनगर 2,  *खटाव तालुक्यातील*     हिवरवाडी 1, एनकुळ 1, मायणी 1, जायागाव 1,  पुसेगाव 4, बुध 1, म्हासूर्णे 1,  *माण तालुक्यातील*  कुकुडवाड 1, दहिवडी 10,  गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु. 3, धामणी 1, आंधळी 1,  नरवणे 10, म्हसवड 1, एकले 1, पळशी 1,  *कोरेगाव त...

खाद्यपदार्थ विक्री परवाना म्हणजे काय? तो कोठून व कसा मिळवावा.

Image
खाद्यपदार्थ  विक्री परवाना म्हणजे काय? तो कोठून व कसा मिळवावा.   ब्यूरो  रीपोर्ट - प्रदिप पाटिल.   अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचे अन्न उत्पादन, वितरण आणि विक्री करण्यासाठी अन्न परवाना बंधनकारक केला आहे.ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना फुड परवाना म्हणजेच FSSAI लायसन्स बंधनकारक आहे. त्यानुसार फक्त वितरणाच्या संस्थेने अन्न परवाना काढणे पुरेसे नाही; तर वितरण करणाऱ्या प्रत्येकाकडे हा अन्न परवाना असणे आवश्‍यक आहे. याचे शुल्कही कायद्याने निश्‍चित केले आहे.  FSSAI परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?    ही नोंदणी राज्य सरकार ने आता घरी तयार होऊन विकल्या जाणाऱ्या केक, चॉकलेट्स या खाद्यपदार्थां साठी एक परवाना घेणं बंधनकारक केलं आहे.तसेच डेअरी युनिट, तेल प्रोसेसिंग युनिट, कत्तलखाणा,  मांस प्रक्रिया युनिट, Relabellers  आणि Re-packers, प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट, घाऊक विक्रेता,  किरकोळ विक्रेता, वितरक, पुरवठादार, ढाबा, खानावळ, क्लब /कॅन्टीन,...

तेरा वर्षाच्या निरागस "जान्हवीला " मदतीची गरज .

Image
  तेरा वर्षाच्या निरागस "जान्हवीला " मदतीची गरज  .      शिराळा -  प्रतिनिधी (आनंदा सुतार)     कोकरुड ता.शिराळा येथील कु.जान्हवी संजय घोडे या निरागस बाळाची करुन कहाणी  घरी आई  वडील  आणि लहाण भाऊ असा परीवार आहे .जान्हवी इयत्ता ७ च्या वर्गात अजय इंटरनॅशनल स्कुल रेड ता.शिराळा येथे शिकत असुन ती शांत निरागस आहे, ती आजारपणाशी लहान पणा पासुनच दोन हात करत आहे.   जान्हवीचे वडील संजय घोडे हे शेतकरी कुंटुबातील आहेत. त्यांना वडीलार्जीत पंधरा गुंठे शेत जमिन आहे, त्यावरच त्यांचा व कुंटुबाचा गाडा चालु आहे! जान्हवीच्या दवाखण्यामुळे खर्च वाढतच चाललायं यामुळे खर्च काही केल्याने भागत नाही,म्हणुन बॅकेचे कर्ज काढुन तसेच पै पै जमा करुन पोटच्या गोळ्याचा दवाखना सुरु ठेवला आहे.     चिल्ड्रन हाॅस्पीटल महालक्ष्मी मुंबई येथील डाॅक्टरांनी  बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही वैद्यकीय प्रक्रिया त्वरीत करणे गरजेचे असल्याचे सांगितले असुन, त्यासाठी एकुण अपेक्षीत खर्च ३५ लाख ५० हजाराच्या घरात  येईल  हे ऐकुण जान्हवीच्या घरच्याचं मात्र कंबरटेच मोडले...

युवा नेते मा.अतुल भोसले (बाबा) यांच्या उपस्थितीत जिंती येथे य. मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासदांचा संवाद मेळावा पार पडला.

Image
  युवा नेते मा.अतुल भोसले  (बाबा) यांच्या उपस्थितीत जिंती येथे य. मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासदांचा संवाद मेळावा पार पडला. उंडाळे - प्रतिनिधि, यशवंतराव मोहिते  कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी  युवा नेते अतुल भोसले (बाबा) जिंती (तालुका कराड) येथे सभासदांचा संवाद मेळावा घेतला.  यावेळी य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील (भाऊ ) मा.पंकज पाटील (युवा मोर्चा कराड दक्षिण )प्रताप कारंडे,जगन्नाथ कोल्हे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.  मा.बाबांनी सभासद,शेतकरी यांना मार्गदर्शन केले तसेच जिती गावचे सरपंच जयवंत शेवाळे यांनी ही सभासद,शेतकरी यांना  मार्गदर्शन केले यावेळी पोलीस पाटील संतोष पाटील,तानाजी आण्णा पाटील,भिमराव पाटील त्याच बरोबर जिींती गावचे व आकाईचीवडी चे सभासद,शेतकरी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु.

Image
130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु.   सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 130 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  *सातारा तालुक्यातील* सातारा 1,  शहरातील  तामजाई नगर 1, अमरलक्ष्मी 2, खेड 2, शाहूपूरी 2, गोडोली 2,  कुसवडे 1, सासपडे 1,  सदरबझार 1, जायगाव 1, शनिवार पेठ 1,  *कराड तालुक्यातील* कराड  शहरातील मंगळवार पेठ 1, रेणूकानगर  1, बुधवार पेठ  1, सैदापूर 2, सवदे 4,  बेलवडे 1, मसूर 1, घारेवाडी 1, मलकापूर 2, कार्वे नाका 3, तांबवे 3,  *पाटण तालुक्यातील*    पाटण 1, कोयनानगर 1, नाटोशी 2, येरळवाडी 1, शेंडेवाडी 2,  *फलटण तालुक्यातील*   लक्ष्मीनगर 1, तरडफ 1, शिवाजीनगर 1, संगवी 1,  *खटाव तालुक्यातील*   वडूज 1, खुटबाव1, कातरखटाव 1,  औंध 1,  *माण तालुक्यातील*   शिंगणापू...

लग्न समारंभास 100 व्यक्तींनाच परवानगी. जिल्हाधिकारी यांनी दिल्या सुचना.

Image
  लग्न समारंभास 100 व्यक्तींनाच परवानगी. जिल्हाधिकारी यांनी  दिल्या सुचना.              सातारा दि. 25 : (जिमाका) : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 या आजाराच्या रुग्णसंख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या संभाव्य धोक्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांनी लग्न समारंभ  अयोजित करण्याबाबत वधु, वर व मंगल कार्यालय चालकांना खालील प्रमाणे विशेष सुचना निर्गमित केल्या आहेत.             लग्न समारंभाच्या कार्यालयात जास्तीत जास्त 100 व्यक्तींनाच (भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी-वाढपी, इ. सह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे. लग्न समारंभाच्या अगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेवून संबंधित तहसिलदार यांची पूर्व  परवानगी घेणे बंधनकारक आहे. मंगल कार्यालयाच्या परिसरात अथवा ज्या ठिकाणी लग्न कार्य आहे या...

सार्वजनिक पाणी पुरवठा, कनेक्शन काहीच्या घरात ..

Image
  सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, नळ कनेक्शन  मात्र काहींच्या घरात .    "उंडाळे ग्रामपंचायत चा अजब कारभार ."     उंडाळे - प्रतिनिधि (प्रदिप पाटिल) उंडाळे ग्रामपंचायतीच्या मार्फत वैयक्तिक पाणी पुरवठाच्या नळ कनेक्शन देण्यासह सार्वजनिक ठिकाणी नळ कनेक्शन काढण्यात आली आहेत. बहुतांश ठिकाणी "दलित वस्ती सुधार योजना पाणी पुरवठा"च्या माध्यमातून दलित वस्तीसह गावामध्ये काहि ठिकाणी या माध्यमातून सार्वजनिक नळ कनेक्शन काढण्यात आले होते. काळाच्या ओघात सार्वजनिक असणारे नळ कनेक्शन स्वमालकीचे होण्याबरोबर या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत संबंधिताना अभय देण्यासह वरकमाईवर भर देवुन ग्रामपंचायत शिपाई मात्र शिरजोर झाल्याचे चित्र दिसुन येत आहे त्याच बरोबर यांना अभय हे सरपंच का ग्रामसेवकांचे हे काळाबरोबर न उलघडलेले कोडेचं म्हणावे लागेल. उंडाळे येथील पाणी पुरवठ्यासाठी दोन ठिकाणहुन पाणी पुरवठा करण्यात येतो. बहुतांश वैयक्तिक घरामध्ये कनेक्शन असुन त्या मार्फतचं पाणी पुरवठा केला जातो.  तर उन्हाळामध्ये सार्वजनिक असलेल्या "दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठेच्या पाणी ...

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी कठोर नियम लागु . __जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी.

Image
  कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी कठोर नियम लागु . __जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी. सातारा दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर  लावण्यात आलेले बिुलांश निर्बंध हटवण्यात आले असून विविध सामसाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजनैतिक व इतर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, सातारा शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यात दि. 25.2.2021 रोजीच्या रात्री 00.00 पासुन ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.  सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वाजेलेपासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील.  सातारा जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉ...

204संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु.

Image
    204संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु.   सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 204 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1,  सदरबझार 1,अंबेधरे 1, खिंडवाडी 11, संगमनगर 1, शाहुपुरी 2, केसरकर पेठ 2, शनिवार पेठ 1, माची पेठ 1, जकातवाडी 1, कराड तालुक्यातील कराड 2, वहागाव 1, मसूर 1, पाटण तालुक्यातील पाटण 1,   फलटण तालुक्यातील फलटण 5, शेरेवाडी 1, गोळीबार मैदान 1, जावली 1, वाठार फाटा 1, खराडेवाडी 1, मंगळवार पेठ फलटण 1, स्वामी विवेकानंद नगर 1, गिरवी 2, सोमंथळी 1, वाखरी 2, वाढळे 1, गोखळी 1,   खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1, वेटणे 3, पुसेगाव 5, काटकरवाडी 3, इसापूर 1, रेवळेकरवाडी 1, बुध 2, माण तालुक्यातील इंजबाव 1, झाशी 2, दहिवडी 45, पिंगळी 1, आंधळी 4, कुळकजाई 1, कोरेगाव तालुक्यातील अंभेरी 1, रहिमतपूर 2, साप 1, ...

रस्ता माझा मी रस्ताचा, उंडाळे मारुती मंदिर परिसरात पार्किंग ची दुरावस्था.... ग्रामपंचायती मार्फत अभय ? कोण न्याय देणार ,सर्वसामान्याची आर्त हाक .

Image
  रस्ता माझा मी रस्ताचा, उंडाळे मारुती मंदिर परिसरात पार्किंग ची दुरावस्था. ग्रामपंचायती मार्फत अभय ? कोण न्याय देणार ,सर्वसामान्याची आर्त हाक . उंडाळे - प्रतिनिधि,( प्रदिप पाटील) उंडाळे ग्रामपंचायत आणि त्याचा कारभार गत पाच वर्षापासुन अजब, गजबचं पाहावयास मिळतो. बसस्थानकावर नेहमीचीचं पार्किंग ची गैरसोय व फुटपाथवर अतिक्रमण नित्याचीच बाब झाली असुन गावठाण परिसरातही रस्त्यामध्ये पार्किंग दिवसेंदिवस महाभयंकर चित्र दिसुन येत असुन मात्र उंडाळे ग्रामपंचायत या बाबतीत अनभिज्ञ दिसुन येते.   उंडाळे आणि परिसरातील महत्वाची बाजारपेठ उद्यायास येत असून बसस्थानकासह  गावठाण परिसरात पार्किंग ची व्यवस्थेवर स्थानिक प्रशासन म्हणुन कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती मार्फत  हेतु परस्पर  लोकप्रतिनिधीच्या  हितासाठी दुर्लक्ष होत असून त्याच्या अधिपत्याखाली काहि मंडळी स्वार्थ साथत आपला तो "बाबु दुस-याचं ते कारंट" या अविर्भावात वावरंत असुन माझंच ते माझंच आणि दुसऱ्या चं तेही माझंच याच्या अतर्गतं सार्वजनिक ठिकाणी आपल्या गाड्या रस्त्यामध्ये लावुन सार्वजनिक वाहतूकीस   अडथळा करत आहेत, मा...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे 01 मार्च पर्यंतचे सर्व नियोजित बैठका,कार्यक्रम रद्द ! जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन.

Image
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे 01 मार्च पर्यंतचे सर्व नियोजित बैठका,कार्यक्रम रद्द ! जनतेने शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन.             सातारा दि. 22 (जिमाका) :  राज्यात गेल्या काही दिवसात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दि. 22 फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक,धार्मिक कार्यक्रम,मिरवणूक,मोर्चे,यात्रांवर शासनाने बंदी घातली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे दि.01 मार्च, 2021 पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम, बैठका रद्द केल्या आहेत.  गृहविभागाच्या अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या बैठका गरजेनुसार  गृहविभागामार्फत देण्यात आलेल्या  सर्व नियमांचे पालन करुन घेणार असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी दिली.  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री   उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना दिला आहे. कोरोनाला रोखण्या...

95संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु.

Image
  95संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु.   सातारा दि. 22 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 95 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  *सातारा तालुक्यातील* सातारा 4, खोजेवाडी 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, लिंब 4,  *कराड तालुक्यातील* मसूर 1 *वाई तालुक्यातील* बावधन 3 *फलटण तालुक्यातील* फलटण 2, तांबवे 1, निंभोरे 1,  लक्ष्मीनगर 1, राजुरी 1, सगुनामाता नगर 2 *खटाव तालुक्यातील* नांदवळ 1, मांडवे 1, कातरखटाव 4, येराळवाडी 2, सिद्धेश्वर कुरोली 1,  नांदोशी 1, औंध 1, नेर 1, काटकरवाडी 1, फडतरवाडी 1, मायणी 1, अंबवडे 1,   *माण तालुक्यातील* पवारवाडी 1, पिसाळवाडी 2, म्हसवड 1, दहिवडी 7, तुपेवाडी 2, भोवडी 1, बोडके 1, वावरहिरे 1, नरवणे 1,  *कोरेगाव तालुक्यातील* न्हावी बु 1, कोरेगाव 5, ओगलेवाडी 1, आसनगाव 3, रणशिंगवाडी 1, वाठार स्टेशन 3,  *खंडाळा तालुक्यातील* लोणंद 5,  शि...

53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

Image
  53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.   सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 2,  सदर बझार 1, बुधवार पेठ 1, तामजाई नगर 1, पिंपळवाडी 1, पोगरवाडी 1,  खिंडवाडी 1, बोरगाव 1, पिरवाडी गोरखपूर 2, कराड तालुक्यातील कराड 2, सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 3, मलकापूर 1, साजूर 1, उंब्रज 1, शेणोली 1, पाटण तालुक्यातील बहुले 1, वाई तालुक्यातील कळंबे सर्जापूर 1, ब्राम्हणशाही 1, फलटण तालुक्यातील जाधववाडी 1, खटाव तालुक्यातील मायणी 1, खटाव 1, कातरखटाव 2,   माण तालुक्यातील जाशी 1, दहिवडी 9, शेवरी 1, गोंदवले बु 1, कोरेगाव तालुक्यातील  कोरेगाव 2, आसनगाव 1, खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, पिंपरी बु 1, महाबळेश्वर तालुक्यातील अकेगानी 1, जावली तालुक्यातील  मेढा 2,   इतर 1 बाहेरील जिल्हृयातील चेंबूर 1, एकूण नमुने -337859 एकूण बाधित -57936   घरी सोडण्...

70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु.

Image
  70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु.   सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  *सातारा तालुक्यातील* सातारा 7, संगमनगर 2, शहूपुरी 1, सैदापूर 1, कोडोली 1, वेळे 1, गोवे 1, देगाव 1, सातारा रोड 1, मोळाचा ओढा 1, * कराड तालुक्यातील* मलकापूर 2, फडतरवाडी 1, पाडळी 3, गायकवाडवाडी 1,    *पाटण तालुक्यातील* शेंडेवाडी 1,  *वाई तालुक्यातील* आझर्डे 1, कवठे 2, माठेकरवाडी 1, ,    *फलटण तालुक्यातील* गुणवरे 1,    *खटाव तालुक्यातील* नांदोशी 1, डंभेवाडी 1, जायगाव 1, पुसेगाव 1, कातरखटाव 2, मांडवे 2,  *माण तालुक्यातील* दहिवडी 3, बिदाल 1,  *कोरेगाव तालुक्यातील*  तारगाव 2, रुई 1, एकसळ 1, सासुर्वे 3,    *खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, लोणंद 1,  अहिरे 2, सुखेड 1, शिरवळ 2,  ...

77 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

Image
  77 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.   सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 77 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील सातारा 1, गोडोली 1, वाढे 1,शिनवार पेठ 1, सदर बझार 1, कासुरडे 1, आकले 1, शाहुनगर 1, गोजेगांव 1,  कराड तालुक्यातील कराड 1, सावडे 2, खेर्डे 1,कालेटेक 1,   पाटण तालुक्यातील वरपेवाडी 1,  वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, भुईंज 1, वासोले 1, कवठे 1, फलटण तालुक्यातील फलटण 2, आसु 1, काळज 2, कोळकी 1, वाडळे 1, मंगळवार पेठ 1, पवार वाडी 1,  खटाव तालुक्यातील खटाव 1, कातकरवडी 1, कातरखटाव 1, नेर 1, पुसेगांव 1,  माण तालुक्यातील राजवाडी 1, दहीवडी 4, म्हसवड 1,  कोरेगाव तालुक्यातील  कोरेगांव 2, सातेवाडी 1, वाठार स्टेशन 6, आसनगाव 3,  खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 3, अहिरे 2, लोणंद 2, देवघर 2, आसवली 1, महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 4, दरे 2,खिंगर 1, जावली तालुक्...

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार.

Image
  जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतायत लोकांनी सतर्क राहावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार. - गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई. सातारा दि. 18 जिमाका): राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी   प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.       रस्त्यावंर विना मास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूच...

उंडाळे ग्रामपंचायत प्रशासन सुस्त, पादचारी चिंताग्रस्त . " ग्राहकांची लुट ,पादचारी चिंताग्रस्त."

Image
  उंडाळे ग्रामपंचायत प्रशासन सुस्त, दुकानदार मस्त,         "  ग्राहकांची लुट ,पादचारी  चिंताग्रस्त." उंडाळे - प्रतिनिधि,  ( प्रदिप पाटील.) कराड ते येणपे पर्यंत नव्याने होत असलेला मार्ग व विस्तारणीकरणाचे काम सध्या युध्द पातळीवर सुरु असुन सदरील मार्ग भविष्यकाळात दळणवळणामुळे मैलाचा ठरणार असुन यामुळे या परिसराची प्रगती होईल यात तिळमात्र शंकाच नाही. मात्र रस्त्याच्या विस्तारणीकरणा गैरफायदा घेत उंडाळे बस्थानक परिसरात रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या"गटर वजा फुटपाथ"वर अतिक्रमण करत भाजीपाला, वडापाव,फळ विक्रत्यांनी व्यवसाय उभारलाय . यात कीती जण हे परवाना धारक आस्थापना  चालवतात हे पहावे  लागेल. सेवा  देणारे मनमानी दराने ग्राहकांची लुट करतात. ग्रामिणभाग असलेने  या गोष्टी  ग्राहक  पहात नाही पण कर  रूपाने  मिळत असलेला कर बुडतो व विकासाच्या चक्राला बाधा येते. आपल्या आस्थापना मालकी परवाना, ठीकाण,आस्थापनाचे नाव याचे  प्रमाणपत्र ग्राहकाला दिसेल असे लावणे बंधनकारक आहे .हे या ठीकाणी फार दुर्मिळ दिसत किंबहुना दिसतही नाही....

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जीवन संजीवनी प्रशिक्षण .

Image
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जीवन संजीवनी प्रशिक्षण . "संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शेखर कोगनुळकर यांनी मार्गदर्शन केले." उंडाळे - प्रतिनिधि, (प्रदीप पाटील)                               रस्ते सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड येथे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जीवन संजीवनी प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षण वर्गास संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर शेखर कोगनुळकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद सगरे संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री हणमंतराव अवघडे, मार्गदर्शक श्री प्रकाश बडदरे, सूर्यकांत कोळेकर जिल्हा कोषाध्यक्ष स्वप्नील साळुंके जिल्हा संघटक श्री सुनील डोंगरे,दक्ष संघटनेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चिटणीस सिराज तांबोळी, परिवहन निरीक्षक रवींद्र चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष नाजूकबी जमादार ,ज्योतीराम सावंत ,सुनील पानस्कर ,माण तालुका अध्यक्ष किशोर देवकर, सातारा तालुका अध्यक्ष उमेश निकम ,कराड तालुका...

श्री.संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न .

Image
   श्री.संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात  मोफत आरोग्य तपासणी शिबीर  संपन्न . उंडाळे - प्रतिनिधि,(प्रदीप पाटील) योग्य वेळी तपासणी करुन औषध उपचार घेतले तर कर्करोग बरा होतो असे प्रतिपादन शल्यचिकित्सक  डॉ प्रकाश गरुड यांनी केले.  घोगाव ता. कराड येथील श्री  शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात शुक्रवारी  परिसरातील जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी इंटरनॅशनल चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर आणि गरुड कॅन्सर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ प्रकाश गरुड, प्राचार्य विजयानंद अरलेलीमठ, डॉ शेखर कोगनुळकर, डॉ संगीता पाटील, रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष गजानन माने, उपाध्यक्ष राजेश खराटे, रघुनाथ डुबल, यांची उपस्थिती होती.                हे शिबिर श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, सातारा, तसेच रोटरी क्लब ऑफ कराड व ग्रामीण रुग्णालय उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरा...

तब्बल नऊ पुरस्कार जिंकणारी खोजेवाडी ग्रामपंचायत राज्यातही प्रथम.

Image
  तब्बल नऊ पुरस्कार जिंकणारी खोजेवाडी ग्रामपंचायत राज्यातही प्रथम. कराड - प्रतिनिधि, सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी ग्रामपंचायतीचे काम आदर्शवत आहे या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अरुणा विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीचे योग्य प्रकारे काम सुरू आहे त्यांच्या सोबत उपसरपंच राहुल डांगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.बाबासाहेब घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीने आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळवले. घरकुल योजनेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर डिजिटल नॉलेज व्हिलेज राज्यात प्रथम, निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार, पर्यावरण संतुलित योजना पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार अशा प्रकारे चे तब्बल नऊ पुरस्कार जिंकणारी खोजेवाडी ग्रामपंचायत राज्यातही प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या चे सर्व श्रेय या गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ अरुणा विजय जाधव आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानामुळे शक्य झाले.

94संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु.

Image
  94संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु.   सातारा दि. 11 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित   आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील मल्हार पेठ 1, गोडोली 1,संभाजीनगर 2, मालगाव 1, नागठाणे 1, वर्णे 1, कळंबे 2, पानमळेवाडी 2 वाई तालुक्यातील सुरुर 1, फुलेनगर 1, रामढोह 1,  सिद्धनाथवाडी 1, पसरणी 4, वाई 3,  व्याजवाडी 1, लोहारे 1, बोरगाव 1, चिखली 1, फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर 1, जावली तालुक्यातील जावली 1, मेढा 1, रांगेघर 1,  सोमर्डी 1,  माहाते 1,कापसेवाडी 2,   खटाव तालुक्यातील नेर 5, वडूज 2, लाडेगाव 1,  पुसेगाव 2, कातरखटाव 5, ऐनकुळ 2, येरळवाडी 3, मांडवे 10,   कोरेगाव तालुक्यातील दहिगाव 1, सासुर्वे 9, रहिमतपूर 1,  माण तालुक्यातील दहिवडी 9, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, खंडाळा तालुक्यातील लोहम 1, पारगाव 1...

62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

Image
    62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.     सातारा दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  *सातारा तालुक्यातील* सातारा2, पीरवाडी 1,शनिवार पेठ1, विसावा नाका1,एम.आय डीसी1, खेजेवाडी 7,सदरबाजार 1,भुईज1,पिंपरी1,खिंडवाडी1,महागाव1,वडूथ1,मोरे कॉलनी 1,मंगळवार पेठ1, *वाई तालुक्यातील*, बावधन2, रविवार पेठ1,   *पाटण तालुक्यातील* घनवटवाडी 1,नावडी1,मारुल हवेली 1,मरळी 2,गव्हाण1, *फलटण तालुक्यातील*मिरढे 1,मलटण1,जाधवाडी1, *जावली तालुक्यातील*सोनगाव 1, *खटाव तालुक्यातील* निढळ 2,राजाकुर्ले 1,निमसोड1, *कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव3, लासुर्णे 1, ,   *माण तालुक्यातील* म्हसवड 1, दहिवडी 10, गोंदवले बु.2,   *इतर* 4, कुभरोशी 1,म्हवशी 1,जलगेवाडी 1, *एकूण नमुने -322928* *एकूण बाधित -57113*   *घरी सोडण्यात आलेले -54454*   *मृत्यू -1831*  *उपचारार्थ रुग्ण-828*

"रात्रीस खेळ चाले" खरचं प्रशासन अनभिज्ञ आहे का??? "मुरुम , भराव साठी वाळु , रात्रीच्या अंधारात चोरी".

Image
 "रात्रीस खेळ चाले" खरचं प्रशासन अनभिज्ञ आहे का??? "मुरुम भराव साठी ,वाळु , रात्रीच्या अंधारात चोरी" उंडाळे - प्रतिनिधि,(प्रदीप पाटील) ओंड -उंडाळे-येळगाव परिसरातील असणाऱ्या  डोंगर रांगांमध्ये गौण खनिजाचे उत्खननचे प्रमाण वाढलेले दिसून येत असुन या  सर्व ठिकाणी जेसीबी व पोकलेन यासारख्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून ठीक ठिकाणी मुरूम उत्खननाचे प्रमाण वाढलेले आहे. डोंगराळ भागात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. महसूल खात्याची परवानगी, सरकारची रॉयल्टीला ठेंगा दाखवत  हजारो ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक केली जात असुन मात्र या विभागातील जबाबदार प्रशासकीय अधिकारी गाढ झोपेचे सोंग घेवुन असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.    राजकीय वरदहस्त व गलथान प्रशासन अधिका-याच्या बेजबाबदारपणामुळे ओंड,उंडाळे, जिंती तुळसण,घोगाव, येणपे या भागातील गौण खनिज चोरीला लगाम लावणे अशक्‍य झाले आहे. दरम्यान, वेगवेगळ्या ठेकेदार , जेसीबी मशीन मालकानकडुन बेकायदा उत्खनन करुन चोरी होत आहे.      रॉयल्टी  भरण्यांच नाटक,परवाना कमी मुरुमाचा उत्खनन बेसुमार .  मुरुम उकरु...

64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यू.

Image
  64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1  बाधिताचा मृत्यू.   सातारा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 11, सदरबझार 2,  गोडोली 1, मोरे कॉलनी 1, गडकर आळी 2,  वर्ये 1,  एमआयडीसी सातारा 1, वर्ये 1, कराड तालुक्यातील कराड 1, वाघेरी 1, पाटण तालुक्यातील पाटण 1, खटाव तालुक्यातील वडूज 6,  मांडवे 6, अंबवडे 1, मायणी 4,  कलेढोण 3, मोरावळे 1, निमसोड 3, वडगाव 1, पळसगाव 2, कातरखटाव 1, कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 1, दहिगाव 1,  माण तालुक्यातील म्हसवड 2,   इतर 1, येळवडी 1, कवठे 1,    बाहेरील जिल्ह्यातील पुरंदर जि. पुणे 1, पालघर जि. ठाणे 1, नेर्ले ता. वाळवा 1, 1 कोरोना बाधिताचा मृत्यू.  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सासुर्णे ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय महि...

संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव येथे 12 फेब्रुवारी 2021 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर .

Image
  संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव येथे 12 फेब्रुवारी 2021 रोजी  मोफत आरोग्य तपासणी शिबीर . उंडाळे - प्रतिनिधि, घोगाव ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी परिसरातील जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबिर श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, सातारा तसेच रोटरी क्लब ऑफ कराड व ग्रामीण रुग्णालय उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबिरामध्ये कर्करोग या आजाराची चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये कर्करोगाचे निदान तसेच कर्करोग होऊ नये यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपचार या संबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे .  या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटल अहमदनगर या हॉस्पिटलचे डॉ. प्रकाश गरुड यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.   सदर शिबिरामध्ये सकाळी १० ते दुपारी ०४ वाजेपर्यंत रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. घोगाव, उंडाळे व या परिसरातील सर्व गावे, वाड्या येथ...

ग्राम कृषी समिती आणि प्रत्येक शेतकरी लाभार्थी होईल काय ?

Image
  ग्राम कृषी समिती आणि प्रत्येक शेतकरी लाभार्थी होईल काय  ? ब्यूरो रीपोर्ट -  प्रदिप पाटिल,  शेतकऱ्यांना गावामध्ये शेतीचा सर्वांगीण विकासासाठी, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या विविध योजना व प्रकल्पामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी, राज्य ग्रामपंचायत अधिनियमनुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये ग्रामकृषी विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच कृषी विषयक योजनाची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी चौदा जणांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील काही ठराविक नागरिक पुन्हा-पुन्हा शासनाच्या योजनाचा लाभ घेतात. त्याला चाप बसणार आहे.  ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायशी निगडित असते; परंतु हवामानातील बदल, निसर्गाचा अनियमितपणा, पर्जन्यमान, कीडरोग, सुधारित जातींची बियाणे उपलब्ध न होणे, शेती मालाच्या दरामध्ये घसरण होणे आदी कारणांमुळे शेती व्यवसायातून शाश्‍वत उत्पन्न मिळेल, याची खात्री देता येत नाही. या सर्व समस्यांवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने ग्राम कृ...

67 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधिताचा मृत्यू.

Image
  67 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधिताचा मृत्यू.   सातारा दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील  मंगळवार पेठ1, क्षेत्र माहुली 1,  सैदापूर 1,  शाहुपुरी 1, देवपूर 1, कोलेवाडी 1,   फलटण तालुक्यातील  पवारवाडी 1, खटाव तालुक्यातील खटाव 2, पळसगाव 2, मांडवे 2,  राजाचे कुर्ले 1,   कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, वाघजाईवाडी 1, सुलतानवाडी 1, अंभेरी 1, खंडाळा तालुक्यातील  लोणंद 4, वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर 1, वाघजाईवाडी 31,   महाबळेश्वर तालुक्यातील  महाबळेश्वर 1,  माण तालुक्यातील  देवापूर 1, पुळकोटी 1, दहिवडी 3, जावळी तालुक्यातील कुवळोशी 1, सोमर्डी 1,   इतर  खोडजाईवाडी 1, कुरोली 1, 2 कोरोना बाधिताचा मृत्यू  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधा...

127 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यू .

Image
  127 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका  बाधिताचा मृत्यू.   सातारा दि. 7 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  127 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील   सातारा 8, मंगळवार पेठ  5, शुक्रवार पेठ 1,शनिवार पेठ 1,  तामजाई नगर 1,चिमणपुरा पेठ 1, कोडोली 1, गोडोली 1, मालगांव (लिंब) 1, संभाजीनगर 6, राजापुरी 1, मस्करवाडी 1, पानमळेवाडी 1, आरफळ 1, सैदापुर 1,  कराड तालुक्यातील मलकापूर 6, पाटण तालुक्यातील   पाटण 1,  फलटण तालुक्यातील    फलटण 4, मलटण 1,राजुरी 1, तरडगांव 1,कोळकी 3, डोंबाळवाडी 2, खडकी 1,  खटाव तालुक्यातील     डिस्कळ 1, निढळ 1, बुध 2, सिध्देश्वर कुरोली 1, नागाचे कुमठे 1, वडगांव 3, शिरसवडी 1, होळीचागांव 1, कातवडी 1, निमसोड 1, रावेळकरवाडी 1, नेर 1,पुसेगांव 3, गोरेगांव 1,नागझरीतल 1,वडुज 5,  ...