स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण.
स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण.
उंडाळे प्रतिनिधी - पी.डी. पाटील.
उंडाळे ता.कराड भारतात तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मधील विद्यार्थ्यांना कोविंड प्रतिबंधक लसीकरण याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दुसऱ्याच दिवशी आठशे बावन्न विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं. या लसीकरणाला विद्यार्थी वर्गातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी येवती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, प्राचार्य बी आर पाटील, पर्यवेक्षक जे. एस. माळी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक जीवन फुके, डॉ. संदीप नलावडे, डॉ. श्रावणी थोरात, आरोग्य सहाय्यक डी वाय सानप डॉ. प्रशांत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणात प्रारंभ झाला. सकाळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये सुमारे 578 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. तर दुपारच्या सत्रामध्ये माध्यमिक विद्यालयातील 15 ते 18 वयोगटातील 274 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सारिका थोरात, जे.टी. कुचेकर, पी एस पवार ,शरद चौगुले,रोहित चव्हाण, वर्ग शिक्षक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. .
Good
ReplyDelete