Posts

Showing posts from February, 2022

महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न.

Image
  महामार्ग पोलीस कराड यांचे वतीने  मृत्युंजय दूत व नागरिकांचे प्रशिक्षण संपन्न. कराड - प्रतिनिधी.   पोलीस  उपमहासंचालक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अपघातग्रस्त लोकांना मदतीचा हात व प्रथमोपचार , अग्निशमन व आपत्कालीन बचाव या गोष्टींचा समावेश असलेली मृत्यूंजय दूत ही संकल्पना सर्वत्र राबवली जात आहे . सर्व मृत्यूंजय दूत व नागरिकांचे  प्रशिक्षण आ.च.विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेज मलकापूर येथे नुकतेच संपन्न झाले .हे प्रशिक्षण  द रेसिलेंट फौंडेशनचे अनिकेत पाटील ,शैलेश मिश्रा, सिद्धेश काजरे यांनी विविध  प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले.             कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस.वाय.गाडे होते. सर्वच प्रात्यक्षिके डोळ्यांची पारणे फेडणारी होती.तसेच सदरची प्रात्यक्षिके  विद्यार्थी, पालक व शिक्षकांना  व्यावहारीक जीवन जगताना अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.           कार्यक्रमास सेवानिवृत्त सहा पोलिस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस उपनिरीक्षक अन्वर मुजावर,सहा पोलीस निरीक्षक अतुल लोखंडे , प्रा...

केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन.

Image
  केंद्र सरकारच्या  दडपशाहीच्या  विरोधात कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन. " राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे केलेल्या कारवाईच्या विरोधात." कराड - प्रतिनिधी. केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे केलेल्या कारवाईच्या विरोधात राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार दत्त चौक कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील(काका), राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव पाटील, मजहर कागदी,  शिवसेना ग्राहक मंचाचे उपजिल्हाप्रमुख श्री राजेंद्र माने, संतोष पाटील, पांडुरंग चव्हाण, नंदकुमार  बटाणे, कांतीलाल पाटील, ला...

जिल्ह्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन -मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा.

Image
  जिल्ह्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन  -मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा. सातारा दि. 25 :  जिल्ह्यात रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी 0 ते 5 वर्षाच्या आतील बालकांसाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.  दि. 27 जानेवारी 2017 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची संगणकीकृत नोंदणी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा इ. द्वारा करण्यात येत आहे.नोंदणी केलेल्या बालकांना बुथवर येणे सोयीचे व्हावे यासाठी बुथचे ठिकाण व लसीकरणाचा दिनांक असलेली स्लिप वाटण्यात येत आहेत. कोविड  संदर्भात बुथवर सॅनीटायझर, हात धुण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बुथवरील लसीकरण करणाऱ्यास कर्मचारी, स्वयंसेवक, मोबिलायझर यांनी मास्क व ग्लोव्झ घालावेत व प्रत्येक लाभार्थीला लसीकरण केल्यानंतर आपल्या हाताला सॅनिटाईझ करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. बुथवर येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवण्याबाबत व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

सिध्देश्वर सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध .

Image
  सिध्देश्वर सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध. सिध्देश्वर सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख जगताप उपाध्यक्ष पदी तुकाराम जगताप. संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ. कार्वे प्रतिनिधी : वडगाव हवेली (ता. कराड) येथील सिध्देश्वर सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची सन 2022 ते 2027 ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी  एस. एन. पवार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज (गुरुवारी) निवड प्रक्रिया पार पडली. युवा नेते शिवराज जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी करण्यात आल्या. संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी  गोरख जगताप तर उपाध्यक्षपदी  तुकाराम जगताप यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आज सकाळी संस्थेच्या सभागृहात संचालक मंडळाची पहिली मासिक सभा झाली. सुरुवातीस श्री. अशोक जगताप यांनी बैठकीची प्रस्तावना केली. सचिव  जयवंत जगताप यांनी सभेचे इतिवृत्त वाचन केले. बाजार समितीचे माजी संचालक  श्रीरंग साळुंखे यांनी ब...

चचेगाव ( सिद्धार्थनगर ) येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पाईप लाईन शुभारंभ कार्यक्रम संपन्न.

Image
  चचेगाव ( सिद्धार्थनगर ) येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पाईप लाईन शुभारंभ कार्यक्रम संपन्न. मलकापूर - प्रतिनिधी.  चचेगाव,( सिद्धार्थनगर ) ता- कराड येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा नवीन पाईप लाईन शुभारंभ पंचायत समिती सदस्य मा. श्री.उत्तमराव पाटील आण्णा यांच्या हस्ते करण्यात आला.  मा.उत्तमराव पाटील सदस्य पं.स. यांच्या पंचायत समिती निधीतून मागासवर्गीय वस्तीमध्ये पाणीपुरवठा करणे या योजनेअंतर्गत सदर काम हाती घेण्यात आले. या कामाचा पाठपुरावा माजी उपसरपंच युवा नेते राहुल काळोखे यांनी केला. याप्रसंगी सरपंच महेश पवार , ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, युवराज पाटील, कृष्णाजी बोडरे, इ. उपस्थित  होते.त्याचबरोबर  चचेगाव मधील ज्येष्ठ कार्यकर्ते के .डी.पवार, बबन काळोखे ,निलेश पाटील, आदी मंडळी उपस्थित होती तसेच माजी ग्रामपंचायत सदस्या सौ .विजया काळोखे, सौ सारिका काळोखे,    इ. महिला व   ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक राहुल काळोखे काळोखे यांनी केले तसेच मनोगत केडी पवार यांनी केले  या  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नेते कराड तालुका खरेदी-व...

दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार.

Image
दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच  होणार.            ब्यूरो रीपोर्ट - गोंडवाना न्यूज. दे शभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच  होतील, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने  दिला आहे. ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. सीबीएसई, आयसीएसईसहित राज्यांच्या शिक्षण बोर्डाच्या परीक्षा या ऑनलाईन व्हाव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देण्यात कोणतीही अडचण नाही. या युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरला आहे. त्यानंतर विरोधाची याचिका फेटाळून लावण्यात आली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही, शाळांत ऑफलाईन शिक्षण सुरु करण्यात आले नव्हते. तसेच काही ठिकाणी अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नव्हता. तसेच वर्गही पूर्ण क्षमेतेने भरवण्यात आले नव्हते. अशा स्थितीत ऑफलाईन परीक्षा नकोत, असा याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा दावा होता. परीक्षा रद्द करुन पर्यायी मूल्यांकन प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा होतीलच कसा, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. मार्च आणि एप्रिलमध...

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड अपोलोच्या फार्मसी विभागात  करण्यात आली त्यामध्ये धीरज मोहिते, महेश जाधव, रोहित् रधावे, गणेश साबळे, शंतनु लांडे, ऋषिकेश माटेकर, अविनाश कोल्हे, प्रीती साळुंखे, सोनाली डुबल, मनिषा सुतार या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला.  या निवडी करण्यासाठी अपोलोचे कार्यकारी एच आर श्री रोहन पांडे, कार्यकारी संचालन श्री अमोल रोकडे, कार्यकारणी एच आर श्री सुहास राशिवते, मंगल पाटील व फार्मासिस्ट माजी विद्यार्थी काशिनाथ सोरेगाव हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना श्री रोहन पांडे यांनी मार्गदर्शन केले व अपोलो विषयी माहिती दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर उषा जोहरी मॅडम सचिव श्री प्रसून जोहरी सर प्राचार्या वैशाली महाडिक मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची दुरावस्था.

Image
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची दुरावस्था.        दहा वर्ष  स्मारक लोकार्पणा पासून वंचित.        सामाजिक राज्यमंत्री याकडे लक्ष देतील का ? वाळवा  प्रतिनिधी - सुनिल कांबळे.  अंकलखोप ता-  पलूस, जि- सांगली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून  उभे करण्यात आले.. पण त्या स्मारकाची दुरवस्था  झालीआहे. हे ठिकाण  दारू पिण्याचा अड्डा तसेच अवैध गोष्टी होत असल्याचे निदर्शनास येत आहेत यामुळे स्थानिक आंबेडकरी अनुयायांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे सामाजिक न्याय विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  अस्थी असणारे अंकलखोप  हे गाव पण त्या गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  स्मारकाची अवस्था अशी होत आहे . ही बाब खेदजनक आहे. विविध संघटनेच्या माध्यमातून स्मारक  खुले  करण्यासाठी निवेदन देण्यात आली.पण त्याची दखल कोणी घेतली नाही.   सामाजिक राज्यमंत्री तरी याकडे गांभीर्याने लक्ष घालतील का ?...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे नॅशनल वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे नॅशनल वेबिनार संपन्न. उंडाळे :- प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे नॅशनल वेबिनार नुकताच संपन्न झाले या वेबिनार चा विषय होता भारतातील महिलांची प्राचीन आणि आधुनिक स्थिती. या कार्यक्रमासाच्या वक्त्या होत्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडच्या प्राध्यापक डॉ. सुषमा किर्तने त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून विद्यार्थिनींना आपण आधुनिक काळातील स्त्रीप्रमाणे कसे प्रत्येक क्षेत्रात आपण आपले नाव मिळवले पाहिजे व आपले उच्च स्थान सर्व संकटावर मात करुन गाठले पाहिजे हे सांगितले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडिक मॅडम यांनी सुषमा कीर्तने मॅडम यांना ई बुके देऊन स्वागत केले व ई सर्टिफिकेट दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक केतकी शिंदे मॅडम यांनी केले. त्याच प्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूरचे प्राध्यापक डॉ. संतोष खडसे यांचेही व्याख्यान घेण्यात आले डॉक्टर संतोष खडसे हे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या व्याख्यानाच...

भीम आर्मी (संविधान रक्षक दल) या संघटनेची आढावा बैठक कराड येथे संपन्न.

Image
  भीम आर्मी (संविधान रक्षक दल) या संघटनेची आढावा बैठक कराड येथे संपन्न. कराड – प्रतिनिधी. भीम आर्मी संविधान रक्षक दल या सामाजिक संघटनेशी आढावा बैठक कराड येथे पार पडली संघटनेच्या कामाचा आजवरचा आढावा ,नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी व शाखा अनावरण  करण्यांत आले.  या वेळेला भीम आर्मी संविधान रक्षक दल या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रफुल्ल भाई शेंडे  उपस्थित होते. त्याचबरोबर  रमाकांत तायडे महाराष्ट्र राज्य प्रमुख. आण्णासाहेब नेरकर मुख्य महासचिव. उत्तरेश्वर कांबळे महाराष्ट्र उपाध्यक्ष.राजेशजी गवळी  महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ते.सुपडू संदानशिव  महाराष्ट्र राज्य सचिव .रणजित माने महा.राज्य संघटक.  प.महाराष्ट्र अध्यक्ष जावेदभाई नायकवडी. आशिष सोनटक्के विदर्भ प्रमुख.जयाताई बनसोडे मुंबई अध्यक्षा.उपस्थित होत्या. याचबरोबर भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा  पदाधिकारी उपस्थित होते  उपस्थित होते,  यामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष संतोषजी थोरावडे ,सातारा जिल्हा उपाध्यक्ष भागवत कांबळे, सातारा जिल्हा निरीक्षक अशोक मस्के,सातारा जिल्हा कार्याध्यक्ष जिते...

उंडाळेत स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन.

Image
  उंडाळेत स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन संपन्न.  "यावर्षीचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार पुढारीचे संपादक पदमश्री डॉ प्रतापसिंह जाधव यांना समारंभपूर्वक प्रदान." उंडाळे - गोंडवाना न्युज.    थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या नावाने स्वर्गीय विलास काकानी सुरू केलेले उंडाळे चे व्यासपीठ राष्ट्रीय विचाराचे व्यासपीठ असून या व्यासपीठावरून समाज बांधणीचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 48 व्या स्मृतिदिनानिमित्त उंडाळे ता. कराड येथे आयोजित 39 व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी यावर्षीचा प्रतिष्ठेचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉ प्रतापसिंह जाधव यांना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते प्रदान करणेत आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कार्यक्रमाचे संयोजक रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर,जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश जाधव,हरणाई सुत गिरणीचे चेअरमन रणजित देशमुख,ज्येष्ठ नेते साहेबराव पवार, दादा...

कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे कार्यशाळेचे आयोजन.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे कार्यशाळेचे आयोजन. उंडाळे - प्रतिनिधी  श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव या महाविद्यालयामध्ये एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा विषय व्यक्तिमत्व विकास व त्याचे फार्मसी प्रोफेशनल मधील फायदे हा होता त्यासाठी कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी येथील प्राध्यापक डॉ. निरंजन चिवटे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून विद्यार्थ्यांना फार्मसी प्रोफेशनमध्ये शिकत आहात तर तुमची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे तुमची वेशभूषा तसेच वर्तणूक व वेळेचे नियोजन तसेच स्वतःच्या विकासासाठी तुमचे कोणत्या गोष्टीचे ज्ञान अवगत केले पाहिजे व स्वतःचा सर्वांगीण विकास कसा केला पाहिजे हे सांगितले यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, लता मंगेशकर, धीरूभाई अंबानी, सचिन तेंडुलकर इत्यादींची उदाहरणे दिली. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडीक मॅडम यांनी डॉक्टर चिवटे यांचे बुके देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक दीप्ती पाटील मॅडम यांनी क...

शिक्षण,सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तारा, एक संघर्ष योद्धा हरपला.

Image
  शिक्षण,सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तारा, एक संघर्ष योद्धा हरपला. अशोकराव भावके यांचे अपघाती दुःखद निधन. उंडाळे प्रतिनिधी : - पी.डी.पाटील.      घोगांव ता.कराड येथील माळरानावर ज्ञानाची मंदिरे उभारून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची दालने सुरू करून कराड दक्षिण मध्ये शैक्षणीक क्रांती घडवणाऱे एक दिलदार समाजसेवक, युवा नेतृत्व अशोक जगन्नाथ भावके. वय वर्ष५३. जणू एक संघर्ष योद्धा यांचे आज पहाटे घोगाव ता.कराड येथे दुर्देवी अपघाती निधन झाले. कराड दक्षिण मधील एक युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने घोगांव व परिसरावर शोककळा पसरली आहे.          घोगांव तालुका कराड गावचे सुपुत्र श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे व मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोक भावके यांचे मंगळवारी मध्यरात्री अपघाती निधन झाले. कराड -चांदोली रोडवर घोगाव येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या समोरील मातोश्री हॉटेल मध्ये ते जेवणासाठी जात असताना शेडगेवाडी कडून वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दि...

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची वतीने आढावा बैठक संपन्न.

Image
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची वतीने आढावा बैठक संपन्न. कराड -  प्रतिनिधी. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने मुंबई महानगरपालिका निवडणूक पूर्व आढावा बैठक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड डॉ सुरेश माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आगामी निवडणुकी साठी पक्षाची भूमिका काय असेल याची माहिती माने साहेब यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना दिली अनेक पक्ष प्रवेश तसेच नवीन नियुक्ती आज करण्यात आल्या, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष दिपक चौगुले यांनी यावेळी जिल्ह्याच्या वतीने आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढली जाईल असे जाहीर केले, सर्व प्रमुख मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, सोबतच आज वॉर्ड क्रमांक 154 च्या जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ॲड दिनेश राजभर (प्रदेश सचिव), डॉ प्रा रतीलाल रोहित (गुजरात राज्य प्रभारी), मा जितेंद्र निकाळजे (मुंबई प्रदेश अध्यक्ष), मा दिपक एम चौगुले (दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष), मा राम तंगारे (दक्षिण मुंबई अध्यक्ष), मा बाळासाहेब अडांगळे (दक्षिण मध्य मुंबई जिल्हा नेते),  मा वत्सला हिरे (महिला जिल्हा...

गोखले ग्रंथालयास स्पर्धा परीक्षा ग्रंथ भेट.

Image
  गोखले ग्रंथालयास स्पर्धा परीक्षा ग्रंथ भेट.    कराड - प्रतिनिधी. विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयास वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रा. डॉ.स्वाती सरोदे यांनी स्पर्धा परीक्षेस आवश्यक असणारे ग्रंथ व इतर वाचनीय साहित्य भेट दिलेत. त्या प्रसंगी डॉ.स्वाती सरोदे म्हणाल्या, ग्रंथालये ही ज्ञानाची मंदिरे आहेत .प्रत्येकाने ग्रंथालयास ग्रंथ भेट दिल्यास ग्रंथालये समृध्द होतील. ग्रंथालये समृध्द  झालीत तर समाज सुजाण आणि सुसंस्कृत होईल.   यावेळी सैन्य दलातील निवृत्त अधिकारी  संदीप शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास फौजी  धनाजी मोहिते, सीमा कांबळे, ग्रंथालयाचे वाचक, सभासद उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मांनले.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] घोगाव, महाविध्यालयामध्ये वर्कशॉपचे आयोजन .

Image
 श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] घोगाव, महाविध्यालयामध्ये वर्कशॉपचे आयोजन. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] घोगाव हे महाविध्यालय विध्यार्थ्याच्या उज्वल भवितव्यासाठी सतत विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते. असेच नुकतेच झालेले वर्क शॉपचे आयोजन या वर्क शॉपचा विषय होता इंडस्ट्री अवेरनेस एंटरप्रिनरशिप डेव्हलोपमेंट असोसिएट विथ ओपेक्स अक्सलरेटर प्रा. लि. हा होता.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. सचिन कुंभोजे [ओपेक्स अक्सलरेटर प्रा. लि. चे सी.ई.ओ.] हे होते. त्यांनी फार्मासुटिकल एंडस्ट्रीचे फॅक्ट काय आहेत. जॉब  ओपुर्चीनिटीज, दर्जा, प्रॉडक्ट मॅन्युफक्चरिंग तसेच एखादा उध्योग, लघुउध्योग कसा सुरू करायचा अशा विविध विषयावर सचिन कुंभोजे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मा. सिद्धांत जाधव व सचिन पाटकर यांनीही  विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका चवरे यांनी केले.व स्वागत प्राचार्या वैशाली महाडीक यांनी केले. तर सांगता दीप्ती पाटील यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सांगली पदाधिकार्यांची मिटींग संपन्न .

Image
  भारतीय बौद्ध महासभा जिल्हा  सांगली पदाधिकार्यांची मिटींग संपन्न   . शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे. सांगली येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली  यांच्या वतीने, जिल्हा पदाधिकारी  सर्व तालुक्याचे मुख्य पदाधिकारी यांची महत्वपूर्ण मिटींग संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष आयु. रुपेश तामगांवकर साहेब यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक आयु.संजय कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले.या बैठकीस सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

अमोल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ वसतिगृह कोळे येथे खाद्यान्न वस्तूंचे वाटप.

Image
अमोल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त  जिजाऊ वसतिगृह कोळे येथे खाद्यान्न वस्तूंचे वाटप. उंडाळे -  प्रतिनिधी.   महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्यमित्र   व तुळसण ता. कराडचे सामाजिक कार्यकर्ते  अमोल यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ वसतिगृह कोळे या ठिकाणी मुगडाळ , मटकी , चवळी , वाटाणा , मसुरा आणि त्याचबरोबर तेल इत्यादी कडधान्ये स्वरूपात वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते  अविनाश वीर, महेश तानाजी शेवाळे शाखाप्रमुख मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा आगशिवनगर  कोळे गावातील रहिवासी श्री आणि सौ केदार पाडळकर आणि त्यांच्या सुविध पत्नी सौ प्रियांका पाडळकर उपस्थित होत्या.

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह चे यशस्वी आयोजन.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह चे यशस्वी आयोजन. घोगाव ता-कराड : - अपोलोचे  कार्यकारी प्रमुख यांचे स्वागत करता वेळेस महाविद्यालयाच्या प्रचार्या वैशाली महाडीक मॅडम व शिक्षक वर्ग. उंडाळे - प्रतिनिधी . श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी  अपोलो कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सोलापूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा व सांगली या विविध ठिकाणाहून 114 विद्यार्थी आले होते त्यामधून 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामधील या महाविद्यालयातील विद्यार्थी धीरज मोहिते, महेश जाधव, रोहित् रधावे, गणेश साबळे, शंतनु लांडे, ऋषिकेश माटेकर, अविनाश कोल्हे, प्रीती साळुंखे, सोनाली डुबल, मनिषा सुतार यांची निवड करण्यात आली या निवडी करण्यासाठी अपोलोचे कार्यकारी एच आर श्री रोहन पांडे, कार्यकारी संचालन श्री अमोल रोकडे, कार्यकारणी एच आर श्री सुहास राशिवते, मंगल पाटील व फार्मासिस्ट माजी विद्यार्थी काशिनाथ सोरेगाव हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना श्री रोहन ...

यशस्वी नागरिक घडविणेत शिक्षकांचा मोलाचा वाटा. – श्री शशिकांत शिंदे.

Image
  यशस्वी नागरिक घडविणेत  शिक्षकांचा मोलाचा वाटा. – श्री शशिकांत शिंदे. कराड - प्रतिनिधी . श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,संचालित आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ नुकताच संपन्न झाला.  सातारा जि. प. सदस्या मा. सौ.मंगल गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्री.शशिकांत शिंदे गट विकास अधिकारी पंचायत समिती कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.              विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. शशीकांत शिंदे म्हणाले,विदयार्थ्यांनी भावी जीवनात यशस्वी नागरिक व  स्वकर्तुत्वाने मोठे कसे व्हावे याचे उत्तम मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.         श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव,शेती मित्र मा.श्री. अशोकराव थोरात (भाऊ) विध्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना म्हणाले कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व समाजाला दिशा देऊ शकते, असे आपण सर्वजण कर्तुत्वसंपन्न व्हा अशा शुभेच्छा दिल्या.              कार्यक्रमाचे  औचित्य साधून विविध स्पर्धेत यशस्वी व...

नांदगाव रस्त्यावर लावलेल्या अँपेरिक्षा चा अपघात.

Image
  नांदगाव रस्त्यावर लावलेल्या अँपेरिक्षा चा अपघात. उंडाळे - प्रतिनिधी    नांदगाव ता.कराड येथील कराड-चांदोली रस्त्यालगत लावण्यात आलेल्या ऊसाच्या ट्रँकटरच्या पाठीमागे रस्त्यावर लावण्यात आलेल्या अँपेरिक्षास महार्गावरील वाहनाने धडक दिली. यामध्ये अँपेरिक्षा ऊसाच्या ट्रँक्टरच्या पाठिमागे उभी असल्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले.

घर तेथे वाचक संकल्पना राबवावी;- किरण पाटील.

Image
  घर तेथे वाचक संकल्पना राबवावी;- किरण पाटील. कराड - प्रतिनिधी   शालेय जीवनामध्ये वाचनाला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे घर तेथे वाचक ही संकल्पना राबवावी असे मत सातारा जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे तांत्रिक सहाय्यक किरण पाटील यांनी व्यक्त केले.  नांदलापूर ता. कराड येथील सुखशांती सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. स्वामी विवेकानंद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ वाचन आणि वाचनावरील प्रेम जीवनात मार्गदर्शन घडवतात. याच प्रमाणे हल्लीचे पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक झालेले आहेत. याच मुलांना ग्रंथालयाची योग्य सुविधा दिल्यास या गावची मुले प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असतील. अनेक ग्रंथालयांचा सूर असा दिसून येतो मोबाईल इंटरनेट मुळे वाचकांची संख्या कमी झाली आहे. असे असते तर सध्या दूरचित्रवाहीनीच्या विविध वाहिन्या आहेत. यावर अगदी दर तासाला बातम्या दिल्या जातात तरीपण वर्तमानपत्राचा खप कमी झालेला नाही. अनेक ठिकाणच्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. मग वाचन संख्या कमी कशी म्हणता येईल. या सर्व ग...

कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी येथे कॅन्सर जनजागृती व्याख्यानाचे आयोजन.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी येथे कॅन्सर जनजागृती व्याख्यानाचे आयोजन.      घोगाव. ता- कराड :- कॅन्सर विषयी संदेश देताना प्रमुख पाहुण्या, महाविद्यालयाच्या प्राचार्या सर्व युनिटच्या शिक्षिका, विद्यार्थिनी. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कॅन्सर जनजागृती व्याख्यान आयोजित केले होते यावेळी या  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर वर्षा देशपांडे ( संजीवनी हॉस्पिटल कराड) या उपस्थित होत्या. त्यांनी महिलांसाठी कर्करोगाविषयी मार्गदर्शन करताना ब्रिस्ट कॅन्सर व सर्विक्स कॅन्सरचे महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सर बद्दल खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. तसेच कॅन्सर पासून दूर राहायचे असेल तर नियमित व्यायाम हवा हे त्यांनी सांगितले व महिलांच्या प्रश्नांचेही निरसन केले. या कार्यक्रमावेळी कॅश केमिस्टच्या ओनर व महाविद्यालयाचे प्राचार्या वैशाली महाडिक मॅडम, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचाऱ्या पुष्पा पाटील मॅडम तसेच सर्व विभागाच्या शिक्षिका, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रस...

डॉ.रोहित वाघमारे यांची संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेच्या सांगली जिल्हा प्रभारी निवड.

Image
 डॉ.रोहित वाघमारे यांची संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र  या संघटनेच्या सांगली जिल्हा प्रभारी निवड. शिराळा प्रतिनिधी - नानासाहेब कांबळे.  शिराळा तालुक्यातील भविष्याचा वेध घेणारे युवा नेतृत्व , आंबेडकरी चळवळीत हिरीरीने भाग घेणारे , तरुण तडफदार नेते डॉ.रोहित वाघमारे यांची अन्यायाविरुद्ध लढणारी , संपूर्ण महाराष्ट्र व्यापी , निर्भिड , सामाजिक संघटना  ' संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र ' या संघटनेच्या सांगली जिल्हा प्रभारी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मा.सुनिल घोलप यांनी या निवडीबद्दल  विशेष आभार मानले.