गोखले ग्रंथालयास स्पर्धा परीक्षा ग्रंथ भेट.
गोखले ग्रंथालयास स्पर्धा परीक्षा ग्रंथ भेट.
कराड - प्रतिनिधी.
विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयास वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रा. डॉ.स्वाती सरोदे यांनी स्पर्धा परीक्षेस आवश्यक असणारे ग्रंथ व इतर वाचनीय साहित्य भेट दिलेत.
त्या प्रसंगी डॉ.स्वाती सरोदे म्हणाल्या, ग्रंथालये ही ज्ञानाची मंदिरे आहेत .प्रत्येकाने ग्रंथालयास ग्रंथ भेट दिल्यास ग्रंथालये समृध्द होतील. ग्रंथालये समृध्द झालीत तर समाज सुजाण आणि सुसंस्कृत होईल.
यावेळी सैन्य दलातील निवृत्त अधिकारी संदीप शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास फौजी धनाजी मोहिते, सीमा कांबळे, ग्रंथालयाचे वाचक, सभासद उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना नदाफ यांनी मांनले.
Comments
Post a Comment