डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची दुरावस्था.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची दुरावस्था.
दहा वर्ष स्मारक लोकार्पणा पासून वंचित.
सामाजिक राज्यमंत्री याकडे लक्ष देतील का ?
वाळवा प्रतिनिधी - सुनिल कांबळे.
अंकलखोप ता- पलूस, जि- सांगली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून उभे करण्यात आले.. पण त्या स्मारकाची दुरवस्था झालीआहे. हे ठिकाण दारू पिण्याचा अड्डा तसेच अवैध गोष्टी होत असल्याचे निदर्शनास येत आहेत यामुळे स्थानिक आंबेडकरी अनुयायांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे सामाजिक न्याय विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असणारे अंकलखोप हे गाव पण त्या गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची अवस्था अशी होत आहे . ही बाब खेदजनक आहे. विविध संघटनेच्या माध्यमातून स्मारक खुले करण्यासाठी निवेदन देण्यात आली.पण त्याची दखल कोणी घेतली नाही.
सामाजिक राज्यमंत्री तरी याकडे गांभीर्याने लक्ष घालतील का ? स्मारकाचा लोकार्पण मुहूर्त सापडेल का ? असा सवाल नागरिकांकडून होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे बंद असलेले स्मारक लोकार्पण करावे अशी मागणी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांकडून होत आहे.
अंकलखोप.( ता- पलूस, जि- सांगली.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक .
Comments
Post a Comment