घर तेथे वाचक संकल्पना राबवावी;- किरण पाटील.
घर तेथे वाचक संकल्पना राबवावी;- किरण पाटील.
कराड - प्रतिनिधी
शालेय जीवनामध्ये वाचनाला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे घर तेथे वाचक ही संकल्पना राबवावी असे मत सातारा जिल्हा शासकीय ग्रंथालयाचे तांत्रिक सहाय्यक किरण पाटील यांनी व्यक्त केले.
नांदलापूर ता. कराड येथील सुखशांती सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. स्वामी विवेकानंद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ वाचन आणि वाचनावरील प्रेम जीवनात मार्गदर्शन घडवतात. याच प्रमाणे हल्लीचे पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक झालेले आहेत. याच मुलांना ग्रंथालयाची योग्य सुविधा दिल्यास या गावची मुले प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असतील. अनेक ग्रंथालयांचा सूर असा दिसून येतो मोबाईल इंटरनेट मुळे वाचकांची संख्या कमी झाली आहे. असे असते तर सध्या दूरचित्रवाहीनीच्या विविध वाहिन्या आहेत. यावर अगदी दर तासाला बातम्या दिल्या जातात तरीपण वर्तमानपत्राचा खप कमी झालेला नाही. अनेक ठिकाणच्या ग्रंथ प्रदर्शनांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. मग वाचन संख्या कमी कशी म्हणता येईल. या सर्व गोष्टींचा विचार मनामध्ये ठेवून घर तेथे वाचक ही योजना ग्रंथपालाने ग्रामस्थांच्या सहकार्याने अमलात आणली तर लहान लहान मुलांना वाचनाचा छंद लागेल व ग्रंथालयाची वाचक संख्या अधिक होईल. आणि 'वाचाल तर वाचाल' हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश प्रत्येकाच्या मनावर रुजेल.
सुत्रसंचालन ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ.स्नेहल निकम यांनी केले.कार्यक्रमास आर.बी.शिबे साहेब,ह.भ.प.शंकरराव काजारी महाराज,सौ.जयश्री शिबे मँडम,राधाकृष्ण,ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वास निकम उपस्थित होते.आभार ग्रंथालयाचे उपाध्यक्ष जयवंतराव शिर्के यांनी मानले.
Comments
Post a Comment