कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी येथे कॅन्सर जनजागृती व्याख्यानाचे आयोजन.

 कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी येथे कॅन्सर जनजागृती व्याख्यानाचे आयोजन.


     घोगाव. ता- कराड :-कॅन्सर विषयी संदेश देताना प्रमुख पाहुण्या, महाविद्यालयाच्या प्राचार्या सर्व युनिटच्या शिक्षिका, विद्यार्थिनी.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कॅन्सर जनजागृती व्याख्यान आयोजित केले होते यावेळी या  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर वर्षा देशपांडे ( संजीवनी हॉस्पिटल कराड) या उपस्थित होत्या. त्यांनी महिलांसाठी कर्करोगाविषयी मार्गदर्शन करताना ब्रिस्ट कॅन्सर व सर्विक्स कॅन्सरचे महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सर बद्दल खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. तसेच कॅन्सर पासून दूर राहायचे असेल तर नियमित व्यायाम हवा हे त्यांनी सांगितले व महिलांच्या प्रश्नांचेही निरसन केले.

या कार्यक्रमावेळी कॅश केमिस्टच्या ओनर व महाविद्यालयाचे प्राचार्या वैशाली महाडिक मॅडम, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचाऱ्या पुष्पा पाटील मॅडम तसेच सर्व विभागाच्या शिक्षिका, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका आलेकरी मॅडम यांनी केले.  व मान्यवरांचे स्वागत प्राचार्या वैशाली महाडिक मॅडम यांनी केले. प्रास्ताविक दीप्ती पाटील मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी मेणबत्तीची रोशनाई करून स्टॉप कॅन्सर व क्लोझ द  केअर गॅप हा संदेश दिला.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .