बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची वतीने आढावा बैठक संपन्न.


बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची वतीने आढावा बैठक संपन्न.

कराड -  प्रतिनिधी.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने मुंबई महानगरपालिका निवडणूक पूर्व आढावा बैठक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड डॉ सुरेश माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली आगामी निवडणुकी साठी पक्षाची भूमिका काय असेल याची माहिती माने साहेब यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना दिली अनेक पक्ष प्रवेश तसेच नवीन नियुक्ती आज करण्यात आल्या, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष दिपक चौगुले यांनी यावेळी जिल्ह्याच्या वतीने आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढली जाईल असे जाहीर केले, सर्व प्रमुख मान्यवर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, सोबतच आज वॉर्ड क्रमांक 154 च्या जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ॲड दिनेश राजभर (प्रदेश सचिव), डॉ प्रा रतीलाल रोहित (गुजरात राज्य प्रभारी), मा जितेंद्र निकाळजे (मुंबई प्रदेश अध्यक्ष), मा दिपक एम चौगुले (दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष), मा राम तंगारे (दक्षिण मुंबई अध्यक्ष), मा बाळासाहेब अडांगळे (दक्षिण मध्य मुंबई जिल्हा नेते),  मा वत्सला हिरे (महिला जिल्हा अध्यक्ष), मा राजाराम आढाव (चेंबूर प्रभारी), मा सतेश मस्के (चेंबूर अध्यक्ष), मा मयूर आठवले (चेंबूर युवा अध्यक्ष), मा फारुक सय्यद (माहीम अध्यक्ष), मा मेहमूद शेख (धारावी अध्यक्ष) तसेच असंख्य पुरुष, महिला, युवा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .