केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन.

 

केंद्र सरकारच्या  दडपशाहीच्या  विरोधात कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन.

" राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे केलेल्या कारवाईच्या विरोधात."

कराड - प्रतिनिधी.

केंद्र सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर करत सुरू केलेल्या खोट्या चौकशी व दडपशाहीच्या विरोधात आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीद्वारे केलेल्या कारवाईच्या विरोधात राज्याचे सहकार व पणन मंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार दत्त चौक कराड येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील(काका), राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव पाटील, मजहर कागदी,  शिवसेना ग्राहक मंचाचे उपजिल्हाप्रमुख श्री राजेंद्र माने, संतोष पाटील, पांडुरंग चव्हाण, नंदकुमार 

बटाणे, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .