यशस्वी नागरिक घडविणेत शिक्षकांचा मोलाचा वाटा. – श्री शशिकांत शिंदे.

 यशस्वी नागरिक घडविणेत  शिक्षकांचा मोलाचा वाटा.
– श्री शशिकांत शिंदे.

कराड - प्रतिनिधी .

श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,संचालित आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ नुकताच संपन्न झाला.  सातारा जि. प. सदस्या मा. सौ.मंगल गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्री.शशिकांत शिंदे गट विकास अधिकारी पंचायत समिती कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

            विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. शशीकांत शिंदे म्हणाले,विदयार्थ्यांनी भावी जीवनात यशस्वी नागरिक व  स्वकर्तुत्वाने मोठे कसे व्हावे याचे उत्तम मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव,शेती मित्र मा.श्री. अशोकराव थोरात (भाऊ) विध्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना म्हणाले कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व समाजाला दिशा देऊ शकते, असे आपण सर्वजण कर्तुत्वसंपन्न व्हा अशा शुभेच्छा दिल्या.

             कार्यक्रमाचे  औचित्य साधून विविध स्पर्धेत यशस्वी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.          

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्राचार्य श्री.एस.वाय.गाडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सविता पाटील यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री धोंगडे सर यांनी केले.

             समारंभास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. पी.जी पाटील, मलकापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. अजित थोरात, नगरसेवक मा.श्री.आबासो सोळवंडे, अधिकराव सावंत, मनीषा माने, राजू मुल्ला, अरुण धाईगडे, प्रा.संजय थोरात, उपमुख्याध्यापक अनिल  शिर्के,पर्यवेक्षिका सौ.अरुणा कुंभार, जीवन तवटे, आण्णासो पोळ, अमोल शिंदे, मल्लप्पा सुतार, रमेश शिंदे, इस्राईल खान, विभाग प्रमुख मा सौ.शीला पाटील, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक,मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .