चचेगाव ( सिद्धार्थनगर ) येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पाईप लाईन शुभारंभ कार्यक्रम संपन्न.
चचेगाव ( सिद्धार्थनगर ) येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पाईप लाईन शुभारंभ कार्यक्रम संपन्न.
मलकापूर - प्रतिनिधी.
चचेगाव,( सिद्धार्थनगर ) ता- कराड येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा नवीन पाईप लाईन शुभारंभ पंचायत समिती सदस्य मा. श्री.उत्तमराव पाटील आण्णा यांच्या हस्ते करण्यात आला. मा.उत्तमराव पाटील सदस्य पं.स. यांच्या पंचायत समिती निधीतून मागासवर्गीय वस्तीमध्ये पाणीपुरवठा करणे या योजनेअंतर्गत सदर काम हाती घेण्यात आले. या कामाचा पाठपुरावा माजी उपसरपंच युवा नेते राहुल काळोखे यांनी केला. याप्रसंगी सरपंच महेश पवार , ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, युवराज पाटील, कृष्णाजी बोडरे, इ. उपस्थित होते.त्याचबरोबर चचेगाव मधील ज्येष्ठ कार्यकर्ते के .डी.पवार, बबन काळोखे ,निलेश पाटील, आदी मंडळी उपस्थित होती तसेच माजी ग्रामपंचायत सदस्या सौ .विजया काळोखे, सौ सारिका काळोखे, इ. महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक राहुल काळोखे काळोखे यांनी केले तसेच मनोगत केडी पवार यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नेते कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक श्री दयानंद काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) तसेच युवा नेते रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील उंडाळकर दादा यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांमध्ये कोणताही दुजाभाव न करता विकास कामाची गती अशीच चालु राहील असे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment