कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह चे यशस्वी आयोजन.
कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह चे यशस्वी आयोजन.
घोगाव ता-कराड : - अपोलोचे कार्यकारी प्रमुख यांचे स्वागत करता वेळेस महाविद्यालयाच्या प्रचार्या वैशाली महाडीक मॅडम व शिक्षक वर्ग.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी घोगाव या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अपोलो कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सोलापूर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सातारा व सांगली या विविध ठिकाणाहून 114 विद्यार्थी आले होते त्यामधून 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामधील या महाविद्यालयातील विद्यार्थी धीरज मोहिते, महेश जाधव, रोहित् रधावे, गणेश साबळे, शंतनु लांडे, ऋषिकेश माटेकर, अविनाश कोल्हे, प्रीती साळुंखे, सोनाली डुबल, मनिषा सुतार यांची निवड करण्यात आली या निवडी करण्यासाठी अपोलोचे कार्यकारी एच आर श्री रोहन पांडे, कार्यकारी संचालन श्री अमोल रोकडे, कार्यकारणी एच आर श्री सुहास राशिवते, मंगल पाटील व फार्मासिस्ट माजी विद्यार्थी काशिनाथ सोरेगाव हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना श्री रोहन पांडे यांनी मार्गदर्शन केले व अपोलो विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडिक मॅडम यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका चवरे मॅडम यांनी केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर उषा जोहरी मॅडम सचिव श्री प्रसून जोहरी सर प्राचार्या वैशाली महाडिक मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
Comments
Post a Comment