सिध्देश्वर सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध .

 सिध्देश्वर सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

सिध्देश्वर सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख जगताप

उपाध्यक्ष पदी तुकाराम जगताप.

संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ.

कार्वे प्रतिनिधी : वडगाव हवेली (ता. कराड) येथील सिध्देश्वर सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची सन 2022 ते 2027 ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी  एस. एन. पवार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज (गुरुवारी) निवड प्रक्रिया पार पडली. युवा नेते शिवराज जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी करण्यात आल्या. संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी  गोरख जगताप तर उपाध्यक्षपदी  तुकाराम जगताप यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


आज सकाळी संस्थेच्या सभागृहात संचालक मंडळाची पहिली मासिक सभा झाली. सुरुवातीस श्री. अशोक जगताप यांनी बैठकीची प्रस्तावना केली. सचिव  जयवंत जगताप यांनी सभेचे इतिवृत्त वाचन केले. बाजार समितीचे माजी संचालक  श्रीरंग साळुंखे यांनी बोलताना कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदिश जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकाऱ्यांना अडीच वर्षे कालावधीसाठी पदभार दिला आहे. दूध संस्था दुग्धजन्य पदार्थ निर्मिती लवकरच सुरू करणार आहे, असे सांगितले. दादासाहेब जगताप यांनी आभार मानले.


यावेळी माजी सरपंच दिलीप चव्हाण, सत्यवान जगताप, शंकर ठावरे, सोसायटीचे अध्यक्ष मोहन जगताप, माजी अध्यक्ष भानुदास जगताप, जे. के. जगताप, राजेंद्र जगताप, सिध्देश्वर पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण जगताप, मधुकर ठावरे, नूतन संचालक गोरख जगताप, अमृत जगताप, तुकाराम जगताप, प्रकाश महाडीक, दशरथ मदने, श्रीरंग जाधव, नामदेव कोळी, अंजना माने, कुसुम कबाडे उपस्थित होते.

------------------



वडगाव हवेली : सिध्देश्वर दूध संस्थेचे अध्यक्ष गोरख जगताप यांचा सत्कार करताना शिवराज जगताप, समवेत पदाधिकारी.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .