उंडाळेत स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन.

 उंडाळेत स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन संपन्न.

 "यावर्षीचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार पुढारीचे संपादक पदमश्री डॉ प्रतापसिंह जाधव यांना समारंभपूर्वक प्रदान."

उंडाळे - गोंडवाना न्युज.

   थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या नावाने स्वर्गीय विलास काकानी सुरू केलेले उंडाळे चे व्यासपीठ राष्ट्रीय विचाराचे व्यासपीठ असून या व्यासपीठावरून समाज बांधणीचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 48 व्या स्मृतिदिनानिमित्त उंडाळे ता. कराड येथे आयोजित 39 व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी यावर्षीचा प्रतिष्ठेचा दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार डॉ प्रतापसिंह जाधव यांना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते प्रदान करणेत आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कार्यक्रमाचे संयोजक रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर,जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश जाधव,हरणाई सुत गिरणीचे चेअरमन रणजित देशमुख,ज्येष्ठ नेते साहेबराव पवार, दादा उंडाळकर स्मारक समितीचे व्यवस्थापकीय विश्वस्त गणपतराव कणसे, सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक दादासाहेब गोडसे,  यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .