जिल्ह्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन -मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा.
जिल्ह्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन
-मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा.
सातारा दि. 25 : जिल्ह्यात रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी 0 ते 5 वर्षाच्या आतील बालकांसाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
दि. 27 जानेवारी 2017 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची संगणकीकृत नोंदणी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा इ. द्वारा करण्यात येत आहे.नोंदणी केलेल्या बालकांना बुथवर येणे सोयीचे व्हावे यासाठी बुथचे ठिकाण व लसीकरणाचा दिनांक असलेली स्लिप वाटण्यात येत आहेत.
कोविड संदर्भात बुथवर सॅनीटायझर, हात धुण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बुथवरील लसीकरण करणाऱ्यास कर्मचारी, स्वयंसेवक, मोबिलायझर यांनी मास्क व ग्लोव्झ घालावेत व प्रत्येक लाभार्थीला लसीकरण केल्यानंतर आपल्या हाताला सॅनिटाईझ करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. बुथवर येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवण्याबाबत व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment