Posts

Showing posts from October, 2023

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव यांचे वतीने बहे ता.वाळवा येथे रक्तगट तपासणी शिबिर संपन्न.

Image
  राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव यांचे वतीने बहे ता.वाळवा येथे रक्तगट तपासणी शिबिर संपन्न. कासेगाव - प्रतिनिधी. राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगावचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लालबहादूर शास्त्री विद्यालय बहे यांच्या संयुक्त विद्यमाने बहे येथे विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. एस के मोहिते प्राचार्य, राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव व श्रीमती विजया पाटील मुख्याध्यापिका,लालबहादूर शास्त्री विद्यालय बहे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एकूण 260 शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासून त्यांच्या ओळखपत्राचा तपशील बनवताना त्यात रक्तगट रक्तगटाच्या महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. प्राध्यापक डॉ. अतुल चोपडे यांनी विद्यार्थ्यांना रक्तगट किती आहेत, ते कसे तपासले जातात व त्यांचे महत्त्व काय आहे याबद्दल मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सहाय्यक प्राध्यापक एच. एस. कंदले, सह.प्राध्यापिका शैलजा कांबळे, अभिमन्यू जाधव, श्र...

कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे स्वच्छता मोहीम संपन्न.

Image
कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे स्वच्छता मोहीम संपन्न. कासेगाव - प्रतिनिधी. कासेगाव ता.वाळवा. येथील स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर  येथे   कासेगाव स्मशानभूमी , कृष्णा घाट व महादेव मंदिर परिसर येथे  स्वच्छता मोहीम संपन्न झाली. यामध्ये ह .भ .प. बंडासो औंधकर, रामदास शंकर पाटील ,दादासो बोकारे ,आकाराम जयसिंग पाटील ,रमेश दत्तात्रय पाटील व राजकुमार आनंदराव पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला.

येवती गावात राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते यांना गावबंदी.

Image
  येवती ता.कराड, गावात राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते यांना  गावबंदी.   उंडाळे - प्रतिनिधी.                   येवती ता.कराड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने  राजकीय पक्षाच्या  पदाधिकारी व नेते यांना गावबंदी  करण्याचा निर्णय घेण्यात आला .दिनांक 29 रविवार रोजी सकाळी दहा वाजता याबाबतचा लेखी ठराव करण्यात आला .यावेळी गावातील सर्व  ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते .या ठरावांमध्ये एक मुखाने निर्णय घेण्यात आला कि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना गावामध्ये येण्यास बंदी असेल .त्याचबरोबर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर  पाठिंबा देण्यात आला .यावेळी बहुसंख्येने मराठा समाज बांधव व गावातील इतर समाजातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सकल मराठा समाज, कोडोली, ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते मंडळींना गावबंदी.

Image
  सकल मराठा समाज, कोडोली , ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते  मंडळींना गावबंदी. कोडोली - प्रतिनिधी.   सकल मराठा समाज, कोडोली ता. कराड यांच्या वतीने, मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांना गावामध्ये येण्यास गावबंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते करण्यात आला. मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास  जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

Image
राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी निवेदनाद्वारे केली विनंती. कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.) कोयना धरणातून वारंवार पाणी सोडण्याची मागणी करुन देखील शासनाच्या नियोजना अभावी कृष्णा नदी पात्रात पाणी न सोडल्याने मागील काही दिवसांपासून कृष्णा नदी कोरडी पडली आहे. पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध नाही. शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. याच धर्तीवर आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मा. जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देत कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती केली.शासनाने आज १ टीएमसी पाणी सोडणार असे जाहीर केले आहे. मात्र या कठीण परिस्थितीत कमीत कमी ५ टीएमसी पाणी सोडले तरच पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा आहे. यावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.याप्रसंगी आ. मानसिंग नाईक, आ. अरुण लाड, आ. सुमनताई पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जि.प.माजी अध्यक्ष देवराज पाटील उपस्थित होते.

धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा संपन्न.

Image
  धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा संपन्न. शिराळा -प्रतिनिधी.   शेडगेवाडी तालुका शिराळा येथे   स्वामी समर्थ हॉल शेडगेवाडी या ठिकाणी  तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य  संघटनेच्या वतीने व धमचक्र परिवर्तन दिनानिमित्त कामगार मेळावा घेण्यात  आला. त्यामध्ये कामगारांची मोफत आरोग्य तपासणी  करण्यात आली. यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.अविनाश कांबळे ( भाऊ ) तसेच सांगली जिल्हा अध्यक्ष मा.वैभव काळे ( भाऊ ) शिराळा तालुका अध्यक्ष मा.कृष्णा कांबळे ( भाऊ ) व संघनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सोलापूर विद्यापीठाकडून 'कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह' द्वारे विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी.

Image
  सोलापूर विद्यापीठाकडून 'कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह' द्वारे विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी. सोलापूर -प्रतिनिधी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पर्यावरण विभाग, भुशास्त्र संकुल मध्ये शनिवार 21 ऑक्टोबर 2023 रोजी 'कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनानुसार भुशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. पुण्यातील  नामांकित "FHHL" या कंपनी ने या 'प्लेसमेंट ड्राईव्ह' मध्ये भाग घेतला होता. पर्यावरण शास्त्र क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या 'FHHL' या कपंनीचे व्यवस्थापक गणेश रावळ आणि साह्ययक एच आर चे आदित्य चौधरी हे मुलाखत घेण्यास उपस्थित होते. सदर मुलाखतींतून पर्यावरण शास्त्र विभागाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच निवडीचे / ऑफर लेटर देण्यात आले. निवड पत्र वाटपावेळी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने वातावरण आनंदमय झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धुळप यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक ...

सकल मराठा समाज, ओंड, ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते मंडळींना गावबंदी.

Image
  सकल मराठा समाज, ओंड, ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते  मंडळींना गावबंदी. काले - प्रतिनिधी.   सकल मराठा समाज, ओंड ता. कराड यांच्या वतीने, मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांना गावामध्ये येण्यास गावबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास  जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. 

सकल मराठा समाज, साळशिरंबे (खुडेवाडी) ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते मंडळींना गावबंदी.

Image
सकल मराठा समाज, साळशिरंबे (खुडेवाडी) ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते  मंडळींना गावबंदी. उंडाळे - प्रतिनिधी.   सकल मराठा समाज, साळशिरंबे (खुडेवाडी) ता. कराड यांच्या वतीने, आज दि.24/10/2023 रोजी महादेव मंदिर साळशिरंबे येथे, मराठा बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांना गावामध्ये येण्यास गावबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास  जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. यावेळी बहुसंख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात “जागतिक भूशास्त्र आठवडा” उत्साहात संपन्न.

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात “जागतिक भूशास्त्र आठवडा” उत्साहात संपन्न. सोलापूर -प्रतिनिधी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरातील भूशास्त्र संकुलामध्ये “जागतिक भूशास्त्र आठवडा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने दि. १६ ते १८ ऑक्टोबर या दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजिन करण्यात आले होते. संकुलामधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आणि संशोधनात्मक दृष्टीकोन वाढवा आणि त्यांच्यात विषयाची जागरूकता व्हावी यासाठी संकुलामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  दि. १६ ऑक्टोबर वक्तृत्व स्पर्धा, १७ ऑक्टोबर प्रश्न मंजुषा आणि १८ ऑक्टोबर जिओसायन्स आणि तंत्रज्ञान वर संशोधान्त्मक मोडेल्स सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रत्येक स्पर्धेमधून १, २  आणि ३ अशी गुणक्रमे काढण्यात आली. दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आणि या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते.  प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी संकुलास येऊन सर्व मोडे...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थिनींसाठी लैंगिक अत्याचार व शोषण, जागरूकता व विरोध या विषयावर निर्भया पथक कराड येथील महिला पोलीस नाईक दीपा पाटील यांचे मार्गदर्शनात्मक व्याख्यान संपन्न झाले. यावेळी पोलीस नाईक अमोल फल्ले व स्वप्नील साबळे हेहि त्यांच्यासमवेत उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार कसे होतात, कोणत्या माध्यमातून होतात त्याविरुद्ध काळजी कोणती घ्यायची, सावधगिरी कशी बाळगायची तसेच मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर किती घातक ठरू शकतो. आणि बऱ्याच मुली त्यास कशा बळी पडतात, परिणामी विविध धमक्या व भीतीपोटी आजकालची तरुण पिढी त्यास आहारी जाऊन बळी पडतात. म्हणून अशा कुठल्याच धमक्यांच्या भीतीपोटी कुठल्याही गैरप्रकाराच्या आहारी न जाता निर्भया पथक तसेच पोलिसांची मदत घ्या. पोलीस सदैव तुमच्यासाठी तत्पर आहेत असे आश्वासन त्यांनी दिले. व आपल्या शिक्षण व व्यवसाय याकडे लक्ष द्या हेही त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून सांगितले. यावेळी महाविद्य...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं, महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं, महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी.  श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव. येथे श्री प्रसाद भागवत यांचे नुकतेच इम्प्लॉयबिटी स्किल्स इन्व्हरमेंट इन फार्मसी प्रोफेशन या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले. फार्मसी कोर्स पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उत्तम क्षेत्रामध्ये नियुक्ती व्हावी तसेच इतर कला, भाषण कौशल्य, व्यावसायिक दृष्ट्या प्रारंगत व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती कशी पाहिजे याविषयी प्रसाद भागवत यांनी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.  वैशाली पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार प्रदर्शन प्रा. मोनिका चवरे यांनी केले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी शिवाजी नेर्ली यांचे एज्युकेशन मॉरल्स अँड इनव्हारमेंटल सायन्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावरती व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व असावे तसेच पर्यावरण शास्त्र संदर्भात स्वतःचा व्यक्तिमत्व विकास का आवश्यक आहे व तो कसा करावा याविषयी शिवाजी नेर्ली यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केले.  यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका चवरे  यांनी मानले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रगती व अधोगती तसेच विविध सोयी याविषयी पालकांना पण संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आपला पाल्य कशा प्रकारचे शिक्षण घेत आहे, त्याची प्रगती कशी आहे, पालकांच्या काही शंका आहेत का  हे जाणून घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सतत पालक विद्यार्थी व शिक्षक सभा आयोजित केली जाते. त्याच अनुषंगाने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना अभ्यासक्रम, इतर सर्व परीक्षा व  कार्यक्रमाविषयी माहिती दिली. तसेच पालकांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरंसन करण्यात आले. यावेळी काही पालकांनी आपली  मते व्यक्त केली. या सभेसाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. श्रद्धा वैद्य यांनी केले.

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वेबिनार संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये विषशास्त्र  या विषयावरती वेबिनार संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयामध्ये सतत विविध उपक्रम चालू असतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना टॉक्सिकोलॉजी म्हणजेच विषशास्त्र म्हणजे काय, त्याचे परीक्षण कसे केले जाते, त्याचे सखोल ज्ञान का आवश्यक आहे या बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये डॉ. प्रज्ञा चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या सध्या प्रोडा प्रिक्लीनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनाझेशन प्रा. लि. पुणे येथे कार्यरत आहेत. तसेच त्यांनी विषशास्त्राच्या विविध शाखा विषयी व विविध प्रक्रिया, औषधांचे दुष्परिणाम कसे होतात ते कसे पडळतात व ते टाळण्यासाठी काय प्रक्रिया असते याविषयी अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व त्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केले.   यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या  प्राचार्या  पुष्पा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना मोबाईल नावाचे मोठे ग्रहण असून त्याचा वापर मर्यादित व चांगल्या गोष्टीसाठी करावा असे सांगितले. स्वप्न बघा व ती सत्यात उतरवा, चांगले चांगले छंद जोपासा असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील  यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी फार्मसी विभागांमध्ये कशा प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत ते सांगितले. औषध निर्माण शास्त्र म्हणजे काय हे समजावून सांगितले. मानवाला जीवदान देणारे औषध तयार करणारा भारत हा जगातील...

जागतिक पातळीवर हिंदी भाषेचा वापर वाढतोय.

Image
  जागतिक पातळीवर हिंदी भाषेचा वापर वाढतोय.                        - प्रा. मारुफ मुजावर सातारा - प्रतिनिधी.             हिंदी सर्वसामान्य लोकांना समजणारी भाषा आहे. भारतात हिंदी भाषा समजणाऱ्या लोकांचे प्रमाण जवळपास पंच्याऐंशी टक्के आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळापासून आजपर्यंत देशाला एकतेच्या सूत्रात बांधण्याचे काम हिंदी भाषा करीत आहे. वैश्विक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघामध्ये प्रस्तावित अधिकारिक भाषेमध्ये हिंदीचा समावेश करण्यात आला आहे. हिंदी भाषा जगातील दोन क्रमांकची भाषा बनली आहे. जगातील 175 देशात हिंदीचा उपयोग व अभ्यास केला जातोय. हिंदी भाषेमध्ये अनेक भाषेंच्या शब्दांना सामावून घेण्याची पाचक क्षमता आहे. एकूणच जागतिकीकरणात विश्व पातळीवर हिंदी भाषेचा वापर वाढलेला आहे. असे विचार हुपरी कॉलेजमधील हिंदी भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. मारूफ मुजावर यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेज साताराच्या हिंदी विभाग व वाड्.मय मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदी सप्ताह समारोप व बक्षीस वितरण ...

मा.राजेंद्रकुमार अडसुळे यांची वंचित बहुजन आघाडी कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड.

Image
  मा.राजेंद्रकुमार अडसुळे यांची वंचित बहुजन आघाडी कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड. कराड - प्रतिनिधी. वंचित बहुजन आघाडी कराड तालुका यांच्या पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या. यावेळी आयु. राजेंद्रकुमार अडसुळे यांची कराड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडी वेळी प्राध्यापक दिलीप लोखंडे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कराड दक्षिण हे उपस्थित होते. या निवडीबद्दल कराड तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी राजेंद्रकुमार अडसुळे यांचे अभिनंदन केले.

महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांचे विचार आत्मसात करून गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.

Image
  महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांचे  विचार आत्मसात करून गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. ________मा.योगेश नाईक.   शिराळा- प्रतिनिधी.    चिंचोली ता- शिराळा  येथे ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात  संपन्न झाली.यावेळी महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. कविता पाटील व उपसरपंच सौ. रूपाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी चिंचोली या.योगेश नाईक यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले . महात्मा गांधीजींचा या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते, तर संत गाडगेबाबा यांनी गावातील स्वच्छता करून गावातील रोगराई बरोबर अंधश्रद्धा ही नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा आदर्श घेऊन गावातील तळागाळातील लोकांपर्यंत विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करू व आदर्श गाव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहू असे अभिवचन दिले.यावेळी  प्रमुख उपस्थितांचे स्वागत  महिला बचतगट प्रतिनिधी रूपाली जाधव  यांनी केले. ग्रामपंचायत परिसरातील परीसर स्वच्छता करण्यात आली.यावेळी अंगणवाडी  व ग्रामपंचायत विभ...

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिप भाऊ गवई यांनी मानखुर्द येथे दिली सदिच्छा भेट.

Image
  तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिप भाऊ गवई यांनी मानखुर्द येथे दिली सदिच्छा भेट. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- मुंबई मानखुर्द समता पक्षाचे व तथागत ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कायदे विभाग मा.अँड.देवकांत मेश्राम  व समता पक्षाचे नेते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिप भाऊ गवई, यांनी महीला रोजगार व गृह उद्योग निर्माण कशा पध्दतीने करता येईल व महिलांना घर बसल्या कशा पध्दतीने सक्षम करता येईल याचे मार्गदर्शन केले. यावेळी  महिला पदाधिकारी यांनी याप्रसंगी कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.संतोष भाऊ खरात,छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख मा.अंकुश भाऊ हिवाळे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम खरात सर्व मान्यवरांचे मुंबई येथील मानखुर्द येथे सदिच्छा भेट दिली . यावेळी तथागत ग्रुप मुंबई प्रदेश च्या वतीने शाल ,गुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी महिला आघाडी तथागत ग्रुपच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष संघमित्रा ताई एटम, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मनिषाताई घोलप, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष श्वेताताई भालेर...

दिलीप जाधव यांना रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्राप्त.

Image
  दिलीप जाधव यांना रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्राप्त. कार्वे - प्रतिनिधी. (प्रविण पाटील.) रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या 'रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार' 2023 - 2024 आदर्श शिक्षक श्री. दिलीप तुकाराम जाधव मा. चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक कराड पाटण  यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तपत्र रो. किशोर लुल्ला  चेअरमन टी.बी  लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन , सांगली यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.   सहशिक्षक दिलीप जाधव हे सध्या जि. प. प्राथमिक शाळा मानेगाव येथे सेवा कार्यरत असून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा विभागात जिल्हा पातळीपर्यंत बक्षीस प्राप्त केलेली आहेत. तसेच नव उपक्रम, शालेय गुणवत्ता, भौतिक सुविधा, शालेय परिसर सुंदर बनवून स्वच्छ सुंदर शाळा करून जिल्ह्यात शाळा नावारूपाला आणली आहे. त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नासाठी राज्यस्तरापर्यंत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय सुविधा व त्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सतत ते प्रयत्न...

स्वछता हि सेवा उपक्रमाला धर्माधिकारी प्रतिष्ठान चा उस्फुर्त प्रतिसाद.

Image
  स्वछता हि सेवा उपक्रमाला धर्माधिकारी प्रतिष्ठान चा उस्फुर्त प्रतिसाद. प्रतिष्ठान च्या माद्यमातून सर्वत्र स्वछता. कार्वे - प्रतिनिधी.  डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा या केंद्र सरकारच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रतिष्ठानचे अध्यक्ष  पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी  डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले यामध्ये सांगली व सातारा जिल्ह्यातील ही 19 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.यामध्ये शेणोली,सयापूर,करगणी,नरसिंहगाव भाळवणी, मिरज, कर्नाळ, खंबाळे, नागाव, बावची, वशी,कुंडलवाडी, काळमवाडी, तुजारपूर, कापरी, पाडळेवाडी, शेडगेवाडी तूपारी, सावंतपूर, लेंगरे, नागाव, आरवडे,  यामध्ये सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत परिसर, सरकारी दवाखाने, शाळा, स्मशानभूमी, मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले यावेळी ओला व सुका कचरा काढण्यात येऊन सदरचे परिसरात स्वछता करणेत आली.यामधून 33 टन ओला कचरा व  2 टन सुका कचरा निघाला. यावेळी प्रतिष्ठानचे  ...