राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी निवेदनाद्वारे केली विनंती.

कासेगाव - प्रतिनिधी.(उमेश कांबळे.)

कोयना धरणातून वारंवार पाणी सोडण्याची मागणी करुन देखील शासनाच्या नियोजना अभावी कृष्णा नदी पात्रात पाणी न सोडल्याने मागील काही दिवसांपासून कृष्णा नदी कोरडी पडली आहे. पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध नाही. शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. याच धर्तीवर आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मा.जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देत कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती केली.शासनाने आज १ टीएमसी पाणी सोडणार असे जाहीर केले आहे. मात्र या कठीण परिस्थितीत कमीत कमी ५ टीएमसी पाणी सोडले तरच पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा आहे. यावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा.याप्रसंगी आ. मानसिंग नाईक, आ. अरुण लाड, आ. सुमनताई पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जि.प.माजी अध्यक्ष देवराज पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .