कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री संतकृपा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना मोबाईल नावाचे मोठे ग्रहण असून त्याचा वापर मर्यादित व चांगल्या गोष्टीसाठी करावा असे सांगितले. स्वप्न बघा व ती सत्यात उतरवा, चांगले चांगले छंद जोपासा असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी फार्मसी विभागांमध्ये कशा प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत ते सांगितले. औषध निर्माण शास्त्र म्हणजे काय हे समजावून सांगितले. मानवाला जीवदान देणारे औषध तयार करणारा भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी औषध निर्मितीसाठी आपले योगदान दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम काय आहेत व मोबाईलचा चांगल्या कामासाठी कशाप्रकारे वापर करता येईल हेही त्यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या इतर शाखा विषयी माहिती दिली. तसेच नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी सचिव प्रसुन जोहरी सर्व संचालक मंडळ व प्राचार्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले.

Comments
Post a Comment