कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं, महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं, महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव. येथे श्री प्रसाद भागवत यांचे नुकतेच इम्प्लॉयबिटी स्किल्स इन्व्हरमेंट इन फार्मसी प्रोफेशन या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले.
फार्मसी कोर्स पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उत्तम क्षेत्रामध्ये नियुक्ती व्हावी तसेच इतर कला, भाषण कौशल्य, व्यावसायिक दृष्ट्या प्रारंगत व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती कशी पाहिजे याविषयी प्रसाद भागवत यांनी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मोनिका चवरे यांनी केले.

Comments
Post a Comment