पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात “जागतिक भूशास्त्र आठवडा” उत्साहात संपन्न.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात “जागतिक भूशास्त्र आठवडा” उत्साहात संपन्न.


सोलापूर -प्रतिनिधी.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरातील भूशास्त्र संकुलामध्ये “जागतिक भूशास्त्र आठवडा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने दि. १६ ते १८ ऑक्टोबर या दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजिन करण्यात आले होते. संकुलामधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आणि संशोधनात्मक दृष्टीकोन वाढवा आणि त्यांच्यात विषयाची जागरूकता व्हावी यासाठी संकुलामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  दि. १६ ऑक्टोबर वक्तृत्व स्पर्धा, १७ ऑक्टोबर प्रश्न मंजुषा आणि १८ ऑक्टोबर जिओसायन्स आणि तंत्रज्ञान वर संशोधान्त्मक मोडेल्स सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रत्येक स्पर्धेमधून १, २  आणि ३ अशी गुणक्रमे काढण्यात आली. दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आणि या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते.  प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी संकुलास येऊन सर्व मोडेल्स आणि केलेल्या प्रात्यक्षिकांना त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.



पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि मा. कुलगुरू यांचा परिचय करून दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कुलगुरूनी आपल्या अभिभाषणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक केले. या स्पर्धेमध्ये एकूण २६ मोडेल्स चे सादरीकरण करण्यात आले आणि त्यामधून ३ गुंणक्रमे काढून त्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यांनी सर्वच मोडेल्स ची भेटी देऊन प्रशंसा केली. हे विद्यार्थी भविष्यात आविष्कार, अन्वेषण तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सहभाग घेऊन मोठे यश संपादन करतील यातच त्यांची ताकद आहे. तसेच त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्व आणि भाषेवर प्रभुत्व असणे संशोधनात तितकेच महत्वाचे आहे हे हि त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप क्षमता आणि बौद्धिक ताकद आहे. त्यांनी प्रत्येक शैक्षणिक आणि संशोधन संधीचा फायदा घेतला पाहिजे.


तसेच मा. कुलगुरूनी सोलापूरच्या कडक भाकरी चे उदहरण देऊन सोलापुरचे जागतिक महत्व पटवून दिले. यानंतर विजेत्या विद्यार्थ्याना मा. कुलगुरु यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली यावेळी विभागप्रमुख डॉ. धवल कुलकर्णी तसेच सर्व स्पर्धांचे डॉ. फरजाना बिराजदार आणि प्रा. अक्षय चव्हाण यांनी समन्वयक तर संकुलातील सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, शिक्षेकेतर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुलभा बनसोडे यांनी केले.   












Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .