सकल मराठा समाज, साळशिरंबे (खुडेवाडी) ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते मंडळींना गावबंदी.
सकल मराठा समाज, साळशिरंबे (खुडेवाडी) ता.कराड यांच्या वतीने राजकीय कार्यकर्त्यांना व नेते मंडळींना गावबंदी.
उंडाळे - प्रतिनिधी.
सकल मराठा समाज, साळशिरंबे (खुडेवाडी) ता. कराड यांच्या वतीने, आज दि.24/10/2023 रोजी महादेव मंदिर साळशिरंबे येथे, मराठा बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांना गावामध्ये येण्यास गावबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. यावेळी बहुसंख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

Comments
Post a Comment