सोलापूर विद्यापीठाकडून 'कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह' द्वारे विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी.
सोलापूर विद्यापीठाकडून 'कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह' द्वारे विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी.
सोलापूर -प्रतिनिधी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पर्यावरण विभाग, भुशास्त्र संकुल मध्ये शनिवार 21 ऑक्टोबर 2023 रोजी 'कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनानुसार भुशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. पुण्यातील नामांकित "FHHL" या कंपनी ने या 'प्लेसमेंट ड्राईव्ह' मध्ये भाग घेतला होता. पर्यावरण शास्त्र क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या 'FHHL' या कपंनीचे व्यवस्थापक गणेश रावळ आणि साह्ययक एच आर चे आदित्य चौधरी हे मुलाखत घेण्यास उपस्थित होते. सदर मुलाखतींतून पर्यावरण शास्त्र विभागाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच निवडीचे / ऑफर लेटर देण्यात आले. निवड पत्र वाटपावेळी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने वातावरण आनंदमय झाले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धुळप यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील संधी आणि शिक्षण यांची सांगड कशी घालावी या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रा. अक्षय चव्हाण, प्रा. सुलभा बनसोडे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. प्रा. सुयोग बाविस्कर यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावले. डॉ. धुळप यांनी संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून संकुलात विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून अनेक धाडसी आणि प्रशंसनीय निर्णय घेतल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आहे.
***********


Comments
Post a Comment