दिलीप जाधव यांना रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्राप्त.

 दिलीप जाधव यांना रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्राप्त.



कार्वे - प्रतिनिधी. (प्रविण पाटील.)

रोटरी क्लब ऑफ कराड यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या 'रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार' 2023 - 2024 आदर्श शिक्षक श्री. दिलीप तुकाराम जाधव मा. चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक कराड पाटण  यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तपत्र रो. किशोर लुल्ला  चेअरमन टी.बी  लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन , सांगली यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.

  सहशिक्षक दिलीप जाधव हे सध्या जि. प. प्राथमिक शाळा मानेगाव येथे सेवा कार्यरत असून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा विभागात जिल्हा पातळीपर्यंत बक्षीस प्राप्त केलेली आहेत. तसेच नव उपक्रम, शालेय गुणवत्ता, भौतिक सुविधा, शालेय परिसर सुंदर बनवून स्वच्छ सुंदर शाळा करून जिल्ह्यात शाळा नावारूपाला आणली आहे.

त्याचबरोबर शिक्षकांच्या प्रश्नासाठी राज्यस्तरापर्यंत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय सुविधा व त्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सतत ते प्रयत्नशील राहिले. याचबरोबर त्यांनी शिक्षक बँकेत अध्यक्ष म्हणून काम करित असताना स्टॅम्प ड्युटी व व्याजदर कमीत कमी करून शिक्षकांचे हित साधले. त्यांचे माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, व्यावसायिक, प्रगतशील शेतकरी आशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या  त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक  कार्याचा गौरव म्हणजेच त्यांना मिळालेला हा पुरस्कार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रो.डॉ.भास्कर बंडु जाधव माजी रिसर्च डायरेक्टर कोकण कृषी विद्यापीठ, दापोली रो. बद्रीनाथ धस्के प्रेसिडेंन्ट शिवराज माने सेक्रेटरी रो. दत्ता कलबुर्गी प्रोजेक्ट चेअरमन रो. राहुल पुरोहित लिटरसी डायरेक्टर इत्यादी उपस्थित होते.हा कार्यक्रम पंकज हॉटेल, पी.सी. मेमोरियल हॉल, कराड येथे संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .