येवती गावात राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते यांना गावबंदी.
येवती ता.कराड, गावात राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते यांना गावबंदी.
उंडाळे - प्रतिनिधी.
येवती ता.कराड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेते यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला .दिनांक 29 रविवार रोजी सकाळी दहा वाजता याबाबतचा लेखी ठराव करण्यात आला .यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .या ठरावांमध्ये एक मुखाने निर्णय घेण्यात आला कि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व नेत्यांना गावामध्ये येण्यास बंदी असेल .त्याचबरोबर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला .यावेळी बहुसंख्येने मराठा समाज बांधव व गावातील इतर समाजातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Comments
Post a Comment