जागतिक पातळीवर हिंदी भाषेचा वापर वाढतोय.

 जागतिक पातळीवर हिंदी भाषेचा वापर वाढतोय.
             
         - प्रा. मारुफ मुजावर


सातारा - प्रतिनिधी.

            हिंदी सर्वसामान्य लोकांना समजणारी भाषा आहे. भारतात हिंदी भाषा समजणाऱ्या लोकांचे प्रमाण जवळपास पंच्याऐंशी टक्के आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळापासून आजपर्यंत देशाला एकतेच्या सूत्रात बांधण्याचे काम हिंदी भाषा करीत आहे. वैश्विक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघामध्ये प्रस्तावित अधिकारिक भाषेमध्ये हिंदीचा समावेश करण्यात आला आहे. हिंदी भाषा जगातील दोन क्रमांकची भाषा बनली आहे. जगातील 175 देशात हिंदीचा उपयोग व अभ्यास केला जातोय. हिंदी भाषेमध्ये अनेक भाषेंच्या शब्दांना सामावून घेण्याची पाचक क्षमता आहे. एकूणच जागतिकीकरणात विश्व पातळीवर हिंदी भाषेचा वापर वाढलेला आहे. असे विचार हुपरी कॉलेजमधील हिंदी भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. मारूफ मुजावर यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेज साताराच्या हिंदी विभाग व वाड्.मय मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदी सप्ताह समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून 'हिंदी का राष्ट्रीय एवं वैश्विक परिदृश्य'  या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते.

          ते पुढे म्हणाले की जगातील जपान, चीन, रशिया , इंग्लंड, फ्रान्स ही प्रगत राष्ट्रे स्वतःच्या भाषेत सर्व विषयांचे व्यवहार करण्याचा प्रयत्न करतात. भारतात सुद्धा व्यापार, उद्योग, सिनेमा, साहित्य, अनुवाद, प्रसारमाध्यमे, जाहिराती, मालिका, पर्यटन , संशोधन व तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी हिंदी भाषेच्या ज्ञानाची गरज निर्माण झाली आहे. हिंदी संत कवी कबीर, सूरदास, तुलसीदास, भूषण, तुकडोजी  यांचे विचार आजच्या काळात सुद्धा दिशादर्शक आहेत. हिंदी साहित्यकरांनी देश विदेशातील शेतकरी, कामगार, महिला, वृद्ध, युवक, तृतीयपंथी, विस्थापित, दलित व आदिवासी इत्यादींच्या जीवनातील समस्यांचे साहित्याच्या चौकटीत केलेले चित्रण व सुचवलेले उपाय उपयुक्त आहेत.

      अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी सांगितले की कोणत्याही व्यक्तीला आपली मातृभाषा, राष्ट्रभाषा व ज्ञानभाषा इंग्रजी बोलता यायला हवी. भाषा शिक्षणात ऐकणे, बोलणे व लिहिणे या क्रमाने भाषा शिकणे सोईस्कर असते. वाचनाने शब्दसंग्रह वाढतो. शब्दसंग्रह वाढल्यानंतर कोणतीही भाषा शिकणे कठीण नसते. हिंदी  विभागाने घेतलेल्या वक्तृत्व, निबंध लेखन, काव्यवाचन, सुलेखन, चित्रकला व भित्तिपत्रिका लेखन या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यां मधील हिंदी भाषे बाबतची भीती तसेच न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. सातत्याने व कोणताही संकोच न बाळगता भाषा बोलत राहिल्यास भाषेतील बारकावे समजत जातात. भारतात शासकीय नोकरीत तसेच खाजगी नोकरीतील करिअरसाठी हिंदी व इंग्रजी भाषा येणे आवश्यक बनले आहे. 

      यावेळी हिंदी सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध सहा स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.यांमध्ये सुलेखन स्पर्धेतील कु.भाग्यश्री सुनील कांबळे (प्रथम), कु. प्रीती केशव गुंजवटे (द्वितीय), कु. वैष्णवी कमलेश सावंत (तृतीय) व  कु. श्वेता जगन्नाथ पवार ,(उत्तेजनार्थ), निबंध स्पर्धेतील कु. क्रांती रामदास पवार (प्रथम) , कु. प्रीती केशव गुंजवटे (द्वितीय),कु. विनय बाळासाहेब करचे (तृतीय) व कु. वर्षा भरत जाधव (उत्तेजनार्थ) , चित्रकला स्पर्धेतील कु. प्रगती जगन्नाथ शेलार (प्रथम), कु.दिशा दादा बाबर (द्वितीय) , कु. श्रेया वामन भोसले (तृतीय) व कु. निर्मला हरिदास अनुभुले (उत्तेजनार्थ)काव्यवाचन स्पर्धेतील कु. ऋतुजा अरुण कुंभार (प्रथम) , विक्रम सुमंत खरात (द्वितीय), कु. समीक्षा चंद्रकांत चव्हाण (तृतीय)व कु. आयेशा जावेद शेख (उत्तेजनार्थ),भित्तिपत्रिका लेखन स्पर्धेतील कु. श्वेता शरद कुंभार (प्रथम), कु. अनुजा अनिल पोरे (द्वितीय), कु.वर्षा भरत जाधव (तृतीय), कु. सायली शरद माने (उत्तेजनार्थ) तर वक्तृत्व स्पर्धेतील कु. वैभवी विजय काळे (प्रथम),  कु. सायली शरद माने(द्वितीय),  कु. हर्षदा अरुण निकम (तृतीय) तर श्री. सौरभ संजय दूबे(उत्तेजनार्थ) या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला .

        प्रास्ताविक व स्वागत हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हिंदी सप्ताहचे समन्वयक डॉ. संदीप किर्दत यांनी करून दिला. आभार डॉ. सादिक तांबोळी यांनी मानले. बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन डॉ. प्रदीप शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ कोळी यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .