राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव यांचे वतीने बहे ता.वाळवा येथे रक्तगट तपासणी शिबिर संपन्न.

 राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव यांचे वतीने बहे ता.वाळवा येथे रक्तगट तपासणी शिबिर संपन्न.

कासेगाव - प्रतिनिधी.

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगावचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लालबहादूर शास्त्री विद्यालय बहे यांच्या संयुक्त विद्यमाने बहे येथे विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. एस के मोहिते प्राचार्य, राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव व श्रीमती विजया पाटील मुख्याध्यापिका,लालबहादूर शास्त्री विद्यालय बहे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एकूण 260 शालेय विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासून त्यांच्या ओळखपत्राचा तपशील बनवताना त्यात रक्तगट रक्तगटाच्या महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. प्राध्यापक डॉ. अतुल चोपडे यांनी विद्यार्थ्यांना रक्तगट किती आहेत, ते कसे तपासले जातात व त्यांचे महत्त्व काय आहे याबद्दल मार्गदर्शन केले. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सहाय्यक प्राध्यापक एच. एस. कंदले, सह.प्राध्यापिका शैलजा कांबळे, अभिमन्यू जाधव, श्रीकेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले . तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिस्तिपत्र देउन प्रोत्साहन देण्यात ‌आले.





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .