कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थिनींसाठी लैंगिक अत्याचार व शोषण, जागरूकता व विरोध या विषयावर निर्भया पथक कराड येथील महिला पोलीस नाईक दीपा पाटील यांचे मार्गदर्शनात्मक व्याख्यान संपन्न झाले. यावेळी पोलीस नाईक अमोल फल्ले व स्वप्नील साबळे हेहि त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचार कसे होतात, कोणत्या माध्यमातून होतात त्याविरुद्ध काळजी कोणती घ्यायची, सावधगिरी कशी बाळगायची तसेच मोबाईल व सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर किती घातक ठरू शकतो. आणि बऱ्याच मुली त्यास कशा बळी पडतात, परिणामी विविध धमक्या व भीतीपोटी आजकालची तरुण पिढी त्यास आहारी जाऊन बळी पडतात. म्हणून अशा कुठल्याच धमक्यांच्या भीतीपोटी कुठल्याही गैरप्रकाराच्या आहारी न जाता निर्भया पथक तसेच पोलिसांची मदत घ्या. पोलीस सदैव तुमच्यासाठी तत्पर आहेत असे आश्वासन त्यांनी दिले. व आपल्या शिक्षण व व्यवसाय याकडे लक्ष द्या हेही त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून सांगितले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. व त्यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. श्रद्धा वैद्य यांनी मानले.

Comments
Post a Comment