स्वछता हि सेवा उपक्रमाला धर्माधिकारी प्रतिष्ठान चा उस्फुर्त प्रतिसाद.
स्वछता हि सेवा उपक्रमाला धर्माधिकारी प्रतिष्ठान चा उस्फुर्त प्रतिसाद.
प्रतिष्ठान च्या माद्यमातून सर्वत्र स्वछता.
कार्वे - प्रतिनिधी.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा या केंद्र सरकारच्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले यामध्ये सांगली व सातारा जिल्ह्यातील ही 19 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.यामध्ये शेणोली,सयापूर,करगणी,नरसिंहगाव भाळवणी, मिरज, कर्नाळ, खंबाळे, नागाव, बावची, वशी,कुंडलवाडी, काळमवाडी, तुजारपूर, कापरी, पाडळेवाडी, शेडगेवाडी तूपारी, सावंतपूर, लेंगरे, नागाव, आरवडे, यामध्ये सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत परिसर, सरकारी दवाखाने, शाळा, स्मशानभूमी, मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले यावेळी ओला व सुका कचरा काढण्यात येऊन सदरचे परिसरात स्वछता करणेत आली.यामधून 33 टन ओला कचरा व 2 टन सुका कचरा निघाला. यावेळी प्रतिष्ठानचे 604 सदस्य उपस्थित होते.

Comments
Post a Comment