कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वेबिनार संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात वेबिनार संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये विषशास्त्र या विषयावरती वेबिनार संपन्न झाले.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयामध्ये सतत विविध उपक्रम चालू असतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना टॉक्सिकोलॉजी म्हणजेच विषशास्त्र म्हणजे काय, त्याचे परीक्षण कसे केले जाते, त्याचे सखोल ज्ञान का आवश्यक आहे या बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये डॉ. प्रज्ञा चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या सध्या प्रोडा प्रिक्लीनिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनाझेशन प्रा. लि. पुणे येथे कार्यरत आहेत. तसेच त्यांनी विषशास्त्राच्या विविध शाखा विषयी व विविध प्रक्रिया, औषधांचे दुष्परिणाम कसे होतात ते कसे पडळतात व ते टाळण्यासाठी काय प्रक्रिया असते याविषयी अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व त्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केले.
यावेळी त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. मोनिका चवरे यांनी मानले.

Comments
Post a Comment