महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांचे विचार आत्मसात करून गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.
महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांचे विचार आत्मसात करून गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.
________मा.योगेश नाईक.
शिराळा- प्रतिनिधी.
चिंचोली ता- शिराळा येथे ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात संपन्न झाली.यावेळी महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. कविता पाटील व उपसरपंच सौ. रूपाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी चिंचोली या.योगेश नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . महात्मा गांधीजींचा या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते, तर संत गाडगेबाबा यांनी गावातील स्वच्छता करून गावातील रोगराई बरोबर अंधश्रद्धा ही नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा आदर्श घेऊन गावातील तळागाळातील लोकांपर्यंत विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करू व आदर्श गाव निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहू असे अभिवचन दिले.यावेळी प्रमुख उपस्थितांचे स्वागत महिला बचतगट प्रतिनिधी रूपाली जाधव यांनी केले.
ग्रामपंचायत परिसरातील परीसर स्वच्छता करण्यात आली.यावेळी अंगणवाडी व ग्रामपंचायत विभागातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रियांका जाधव यांनी मानले.



Comments
Post a Comment