कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न.


उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयांमध्ये नुकतीच पालक सभा उत्साहात संपन्न झाली.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रगती व अधोगती तसेच विविध सोयी याविषयी पालकांना पण संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. आपला पाल्य कशा प्रकारचे शिक्षण घेत आहे, त्याची प्रगती कशी आहे, पालकांच्या काही शंका आहेत का  हे जाणून घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सतत पालक विद्यार्थी व शिक्षक सभा आयोजित केली जाते. त्याच अनुषंगाने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेवेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना अभ्यासक्रम, इतर सर्व परीक्षा व  कार्यक्रमाविषयी माहिती दिली. तसेच पालकांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निरंसन करण्यात आले. यावेळी काही पालकांनी आपली  मते व्यक्त केली. या सभेसाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. श्रद्धा वैद्य यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .