शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज
शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज____ प्रो डॉ. रत्नदीप जाधव. कराड - प्रतिनिधी. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने मृदा व पाणी परीक्षण या विषयावरती कार्यशाळा संपन्न झाली. सत्र एकचे साधन व्यक्ती प्रो. डॉ. रत्नदीप जाधव विलिंगडन महाविद्यालय सांगली हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, भारतासारख्या कृषिप्रधान देशात शाश्वत शेतीसाठी मृदा व पाणी परीक्षण करणे काळाची गरज आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठावरील नऊ इंच मातीचा थर टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण यातूनच आपल्याला शेती करता येते. तो थर निघून गेला तर जमीन नापीक बनते. यासाठी मृदेत कोणते घटक आवश्यक आहेत. मृदा संवर्धनासाठी काय केले पाहिजे. याचे उत्तर मृदा परीक्षणातूनच मिळते. पाणी म्हणजे जीवन त्यामुळे आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो ते पिण्यायोग्य आहे की नाही यासाठी पाणी परीक्षण तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याचा टीडीएस किती पीएच किती हे तपासूनच आपण त्याचा वापर केला पाह...