वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न. शिराळा - प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते सर हे होते तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका , शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता बारावीतील विद्यार्थिनी कृष्णाली बुगड हिने केले. या कार्यक्रमास प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत हर्षद सूर्यवंशी यांने केले तर इतर शिक्षकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शुभम शेरखाने ,कृष्णाली बुगड अस्मिता माने यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता बारावीतील कुमारी वैभवी नाईक मोनिका देसाई मनस्वी मोरे अस्मिता माने शुभम शेरखाने इत्यादींनी आपली मनोगत व्यक्त केली प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये प्रथम दिवसापासून विद्यालयाने केलेली संस्कार , केलेले मार्गदर्शन आयुष्यभर उपयोगी पडतील असे सांगितले. याप्रसंगी ड...